Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या.

पुणे जिल्ह्यात विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर; मुलाची गळा चिरून हत्या.

पुणे: पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये आज (सोमवार) सकाळी काही शालेय विद्यार्थ्यांमध्ये गँगवॉर झाल्याची घटना घडली आहे. एका खासगी ट्यूशनमध्ये मुलाची (वय १६) गळा चिरून हत्या करण्यात आली आहे.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

एका खासगी ट्यूशनमध्ये विद्यार्थ्याची हत्या झाल्याने राजगुरूनगर शहरात खळबळ उडाली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आहे. हल्लेखोर विद्यार्थी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.

संबंधित विद्यार्थ्यांमध्ये जुना वाद होता. याच वादातून एका विद्यार्थ्यांने दुसऱ्या विद्यार्थ्यावर धारदार चाकुने वार केले. या घटनेनंतर स्थानिकांनी तातडीने मुलाला दुचाकीने आधी खासगी रुग्णालयात नेले. पण खासगी रुग्णालयाने त्याला घेतलं नाही. त्यामुळे रुग्णवाहिका बोलवून त्याला सरकारी दवाखान्यात नेण्यात आले. तिथे त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्या दोन मुलांमध्ये आधी भांडणं झाली होती. त्यानंतर याच भांडणातून वार केले. हा हल्ला क्लासमध्ये झाला होता. त्यानंतर मॅडम जखमी विद्यार्थ्याला घेऊन बाहेर आल्या. बाहेर आणल्यानंतर त्याला रुग्णालयात हलवले, अशी माहितीही प्रत्यक्षदर्शींनी दिली.

पुणे जिल्ह्यात अनैतिक संबंधातून महिलेची क्रूरपणे हत्या…

पुणे जिल्ह्यात गरोदर महिलाचा आढळला मृतदेह; हातावर रविराज नावाचा टॅटू…

पुणे जिल्ह्यात वाढदिवसानिमित्त शोभायात्रा; डीजेच्या गाडीने घेतला एकुलता एका मुलचा बळी…

पुणे जिल्ह्यात विद्यार्थिनीने गळफास घेत केली आत्महत्या…

पुणे जिल्ह्यात मित्राचा पैशासाठी केला खून; आरोपी तासाच्या आत ताब्यात…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka