Dailyhunt
महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून.

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून.

पालघर : प्रेमसंबंधाला युवतीच्या घरातून विरोध होत असल्याचा राग मनात ठेवून प्रियकराने युवतीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. युवतीचा मृतदेह पालघरमधील एकलारे गावाजवळील खाडीच्या खाजण परीसरात सापडला.

तिची ओळख कपडे आणि बॅगवरुन पटवण्यात आली. पोलिसांनी फरार असलेल्या संशयित आरोपी प्रियकराला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरू आहे.

स्नेहा (वय १९) असे मृत युवतीचे नाव आहे. प्रियकर सुमित (वय २१) आणि स्नेहामध्ये लग्नावरुन सतत खटके उडत होते. सकाळी घरातून बाहेर पडताना दोघे एकत्र निघाले. रस्त्यात त्यांच्यात लग्नावरुन वाद सुरू झाला. स्नेहाच्या घरच्यांचा दोघांच्या प्रेमाला विरोध असल्याचा राग मनात ठेवून प्रियकराने भांडण केले. स्थानिक नागरिकांनी भांडणात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला होता. सुमितने रागाच्या भरात स्नेहाच्या डोक्यात दगड घातला. स्नेहा रक्तबंबाळ झाली होती. तिला रुग्णालयात घेऊन जातो म्हणत स्थानिकांना हटकले आणि त्याने गाडीवर बसवून नेले. अखेर तिचा मृतदेह पोलिसांना सापडला तर प्रियकर फरार होता.

लग्न करण्याच्या वादातून प्रियकराने डोक्यात दगड घालून प्रेयसीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना पालघर मध्ये समोर आली आहे . हत्या करून फरार झालेल्या सुमितला पोलिसांनी अटक केली आहे. यामुळे घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

प्रेयसीला भेटायला तिच्या घरी गेलेला प्रियकराचा होरपळून मृत्यू…

महाराष्ट्र हादरला! शिक्षकाच्या एकतर्फी प्रेमाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या…

पुणे जिल्हा हादरला! मुलींना ड्रग्सचे इंजेक्शन, दारू पाजली अन् लॉजवर अत्याचार…

भंडारा हादरला! बहिणीच्या चारित्र्यावर संशय आला अन् पुढे…

महाराष्ट्र हादरला! प्रेयसीचे दुसरीकडे लग्न ठरल्यानंतर गळा चिरून केली हत्या…

The post महाराष्ट्र हादरला! प्रेयसीच्या डोक्यात दगड घालून केला खून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka