जालना: जाफराबाद तालुक्यातील पासोडी येथे पुलाच्या कामावर गेलेल्या 5 मजुरांचा वाळूच्या ढिगार्यात दबून मृत्यू झाल्याची घटना आज (शनिवार) पहाटे साडेचारच्या सुमारास घडली आहे. मजुरांच्या पत्र्याच्या शेडवर वाळूचा टिप्पर टाकल्यामुळे 7 कामगार रेतीखाली दबले गेले.
रेतीत गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाला असून दोन जणांना वाचवण्यात यश आले आहे. मृतांमध्ये एका तेरा वर्षीय मुलीचा आणि एका महिलेचा समावेश आहे.
पुलाच्या कामासाठी गेलेल्या मजूर पत्र्याच्या शेडमध्ये गाढ झोपले होते. कामगार गाढ झोपेत असताना वाळूच्या टिप्परमधून वाळू रिकामी झाली. या वाळूने पत्र्याचे शेड खचून 7 मजूर वाळूत गाडले गेले. यात 5 मजूरांचा वाळूच्या ढिगाऱ्यात दबून मृत्यू झाला. दोन जणांना वाचवण्यात यश आले. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडली असून घटनास्थळी पोलीसांसह स्थानिक ग्रामस्थ पोहोचले होते.
जालना जिल्ह्यातील जाफराबाद तालुक्यातील पासोडी चांडोळ रस्त्यावरील पुलाचे काम सुरू आहे. या पुलाचे काम करणारे कामगार पुलाशेजारीच पत्र्याचे शेड बांधून राहत होते. पहाटे गाढ झोपेत असताना एका वाळूच्या टिप्परने त्यांच्या शेड वरच वाळू रिकामी केली. या वाळूमुळे पत्राचा शेड खचून त्या वाळूत 7 मजूर गाडले गेले. काही वेळाने ही घटना लक्षात आल्यानंतर स्थानिकांनी तातडीने बचाव कार्य सुरू केले. मोठ्या प्रयत्नानंतर एका महिलेसह तेरा वर्षीय मुलीला सुखरूप बाहेर काढण्यात आले. मात्र, पाच मजुरांचा वाळूखाली दबून मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.
मजुरांच्या नातेवाईकांचा आक्रोश सुरू आहे. अपघात घडल्यानंतर स्थानिक रहिवाशांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती. यानंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
भीषण अपघात! पोलिस भरतीची तयारी करणाऱ्या तीन युवकांना एसटी बसने चिरडले…
वाशिम जिल्ह्यात तीन वाहनांमध्ये भीषण अपघात; तिघांचा मृत्यू तर…
पुणे-नाशिक मार्गावर भीषण अपघात, 9 जणांचा जागीच मृत्यू…
गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात! ११ जणांचा जागीच मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! पुण्याहून निघालेले पती-पत्नीसह तिघे ठार…
The post महाराष्ट्रात भीषण अपघात! वाळूच्या ढिगाऱ्याखाली दबून 5 कामगारांचा झोपेतच मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

