Dailyhunt
महिलेचा किस घेऊन पळलेल्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

महिलेचा किस घेऊन पळलेल्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

मुंबई: मुंबईतील मालाडमध्ये चोरी करायला आलेल्या चोरट्याला मौल्यवान वस्तू न सापडल्याने त्याने जाताना महिलेचा किस घेऊन पळ काढला होता. पीडित महिलेने गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी तपास करून चोरट्याला बेड्या ठोकल्या आहेत.

पोलिस पुढील तपास करत आहेत.

मालाडमधील कुरार भागात 3 जानेवारी रोजी ही घटना घडली होती. कुरार पोलिसांनी सांगितले की, महिलेचा विनयभंग आणि दरोड्याचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. मालाडमधील 38 वर्षीय महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, ‘घरी एकटीच असताना आरोपीने घरात प्रवेश करून दरवाजा आतून बंद केला. यानंतर आरोपीने महिलेला धाक दाखवला आणि तिला सर्व मौल्यवान वस्तू, रोख रक्कम, मोबाईल आणि एटीएम कार्ड देण्यास सांगितले. मात्र, महिलेने घरात मौल्यवान वस्तू नसल्याचे सांगताच आरोपीने तिला किस केले आणि तेथून पळ काढला.’

चोर पळून गेल्यानंतर या महिलेने कुरार पोलीस ठाण्यात संपर्क साधला. त्यानंतर भारतीय न्याय संहिताच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनंतर सायंकाळी आरोपीला अटक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचे एका पोलीस अधिकाऱ्याने सांगितले आहे. संबंधित आरोपी हा त्याच भागातील रहिवासी असून, आरोपी आपल्या कुटुंबासोबत राहतो आणि सध्या तो बेरोजगार आहे. आहे. यापूर्वी कोणताही गुन्हा त्याच्यावर नाही. पुढील तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.

Video: पुणे! IT कंपनीत काम करणाऱ्या शुभदा हिच्या हत्येबाबत आरोपी म्हणाला…

सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…

पुणे! विद्येच्या माहेरघरात मुलींचे कपडे बदलतानाचे Video रेकॉर्डिंग…

भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष…

Video: पोलिस अधिकऱ्याचे कार्यालयात वर्दीवरच महिलेसोबत अश्लिल कृत्य…

The post महिलेचा किस घेऊन पळलेल्या चोरट्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka