Dailyhunt
भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष.

भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष.

कोल्हापूर : भाचीने पळून जाऊन विवाह केल्याने चिडलेल्या मामाने भाचीच्या रिसेप्शनच्या जेवणात विष कालवल्याचा धक्कादायक प्रकार कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील उत्रे या गावी घडला आहे.

पण, हा प्रकार आचाऱ्यासमोर घडल्याने मोठा अनर्थ टळला आहे. पन्हाळा पोलीस ठाण्यामध्ये या संदर्भात गुन्हा दाखल झाला आहे. महेश ज्योतीराम पाटील असे मामाचे नाव आहे.

महेश पाटील याच्या भाचीने एक आठवड्यापूर्वी गावातील एका मुलासोबत पळून जाऊन प्रेम विवाह केला होता. भाचीने पळून जाऊन लग्न केल्याने आपली बदनामी झाली या रागातून मामाने थेट रिसेप्शनच्या जेवणामध्ये आचाऱ्यासमोर विष टाकले. जेवणात विषारी औषध टाकत असताना आचारी सुद्धा समोर होता. जेवणामध्ये विषारी औषध टाकत असतानाच मामा आणि आचाऱ्याची झटापट झाल्याची चर्चा आहे. जवणामध्ये विषारी औषध टाकून लोकांच्या जीवास धोका पोहोचवणारा प्रकार उघड झाल्याने मोठा अनर्थ टळला आहे.

भाची ही उत्रे गावात आपल्या मामाकडे राहायला होती. तिचे गावातील एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. काही दिवसांपूर्वी संबंधित युवकाने मामा महेश पाटील याच्याकडे भाचीशी लग्न करायची मागणी घातली. पण मामाने या लग्नाला विरोध केला. यामुळे भाचीने मामाच्या विरोधात जाऊन तिच्या प्रियकराशी लग्न केले. यामुळे आरोपी मामाचा आपली भाची आणि तिच्या सासरच्या मंडळीवर राग होता. याच रागातून मामाने थेट स्वागत समारंभाच्या कार्यक्रमात विषारी औषध टाकल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

जेवणात विषारी औषध मिसळल्याची माहिती हॉलमध्ये समजताच घटनास्थळी मोठा गोंधळ उडाला होता. याप्रकरणी नवरदेव मुलाचे काका संजय पाटील यांनी पन्हाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली. पोलिसांनी अन्नाचे नमुने ताब्यात घेतले असून आरोपीने नेमकं कोणत्या प्रकारचे औषध अन्नात मिसळे होते, याची माहिती घेतली जात आहे. आरोपी फरार असून त्याचा शोध सुरू आहे.

बापरे! सासऱ्याच्या प्रेमविवाहाची सुनेला साताजन्माची शिक्षा…

प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून…

संतापनजक! प्रेमविवाहानंतर मित्रांना बोलवून पत्नीवर सामूहिक बलात्कार अन्…

शाळेत प्रेम! प्रेमविवाह केलेल्या पती पत्नीचा हृदयद्रावक शेवट…

'सैराट'ची पुनरावृत्ती! प्रेमविवाह केला म्हणून युवकाची हत्या…

The post भाचीचा प्रेमविवाह अन् चिडलेल्या मामाने जेवणात कालवलं विष… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka