Dailyhunt
माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; बलात्कार अन् गर्भपात.

माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; बलात्कार अन् गर्भपात.

ठाणे: काँग्रेसचे नेते आणि राज्याचे माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांच्या पुतण्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पृथ्वीराज पाटील असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

ठाण्यातील एका उच्चभ्रू संकुलात राहणाऱ्या युवतीवर (वय २९) लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी ठाण्यातील कापूरबावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पृथ्वीराज पाटील हा सतेज पाटील यांचा पुतण्या आणि डी. वाय. पाटील यांचा नातू आहे. पृथ्वीराज पाटील याच्यावर ठाण्यातील कापूर बावडी परिसरात राहणाऱ्या वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनीला लग्नाचे आमिष दाखवून वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. तसेच तिला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचे देखील तक्रारीत म्हटले आहे.

पीडित युवतीने दिलेल्या तक्रारीनुसार, पीडित युवती आणि पृथ्वीराज पाटील मागील काही काळापासून एकमेकांना ओळखतात. दोघांमध्ये प्रेम संबंध होते. पृथ्वीराज पाटील याने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेवर वारंवार लैंगिक अत्याचार केला आहे. ठाणे, नवी मुंबईसह कोल्हापूर येथील बंगल्यावर घेऊन जात युवतीवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

मुंबई हादरली! जोगेश्वरीत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार; बसला मानसिक धक्का…

विवाहित महिलेवर शेतात बलात्काराचा प्रयत्न; चेहऱ्यासह शरिरावर केले 15 पेक्षा जास्त वार…

पुणे जिल्हा हादरला! युवतीवर सामूहिक बलात्कार करून केले Video शुटिंग….

धक्कादायक! शरीरसुखाची मागणी करणाऱ्या आरोपीची फोनवरून विचित्र मागणी…

पुणे जिल्ह्यातील महिलेच्या खूनाचं गूढ उलगडलं; बिबट्या नव्हे तर उपसरपंच पुतण्या…

The post माजी मंत्र्याच्या पुतण्यावर गुन्हा दाखल; बलात्कार अन् गर्भपात… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka