Dailyhunt
माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तुकडे केले अन् कुकरमध्ये शिजवले.

माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तुकडे केले अन् कुकरमध्ये शिजवले.

हैदराबाद: माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तिचे शरीराचे तुकडे केले आणि तुकड्यांना प्रेशर कुकरमध्ये शिजवले आणि त्यानंतर तलावात फेकून दिल्याची धक्कादायक घटना जिलेलगुडा भागात घडली आहे.

गुरुमूर्ती असे आरोपीचे नाव असून त्याने पत्नी पुट्टवेंकटा माधवी (वय 35) हिचा हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मीरपेट पोलिस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. मृत पुट्टवेंकटा माधवीच्या आईने तक्रार दाखल केल्यानंतर हा प्रकार उघड झाला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी आरोपी गुरुमूर्तीला अटक केली आहे. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली आहे. मीरपेटचे निरीक्षक नागराजू यांनी सांगितले की, ‘आरोपीने सांगितले की त्याने पत्नीचे अवशेष शिजवले आणि तलावात टाकले. गुरुमूर्तीने केलेल्या दाव्यावरून पुढील तपास सुरु केला आहे.’

गुरुमूर्ती आणि माधवी हे आंध्र प्रदेशच्या प्रकाशम जिल्ह्यातील रहिवासी असून त्यांनी 10 वर्षांपूर्वी लग्न केले होते. ते गेल्या पाच वर्षांपासून जिलेलगुडा येथे दोन मुलांसह राहत होते. गुरुमूर्ती हा निवृत्त सैनिक असून सध्या कंचनबाग येथे सुरक्षा रक्षक म्हणून काम करत आहे. माधवीची आई उप्पाला सुब्बम्मा यांनी 18 जानेवारीला तक्रार दाखल केली की, 16 जानेवारी रोजी सकाळी 8 वाजता पती-पत्नीमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला होता. त्यानंतर माधवी दुपारी 12 च्या सुमारास घरातून कोणालाही न सांगता बाहेर गेली आणि परत आली नाही. नातेवाईक आणि शेजाऱ्यांनी तिचा शोध घेतला परंतु ती सापडली नाही.

गुरुमूर्तीने पोलिसांना चौकशीदरम्यान सांगितले की, ‘पत्नीने नंद्याल येथे माहेरी जाण्याचा आग्रह धरल्याने राग आला आणि रागाच्या भरात हत्या केली. पोलिस सध्या आरोपीच्या दाव्यांची सत्यता तपासत आहेत. अद्याप पीडित महिलेचा मृतदेह सापडलेला नाही. पोलिसांचा तपास सुरू असून आणखी पुरावे गोळा करण्याचा प्रयत्न करत आहेत.

धक्कादायक! पुणे शहरात चिमुकल्यासमोरच कात्रीने कापला पत्नीचा गळा; सांगितलं कारण…

जवानाने आठ महिन्यांच्या गरोदर पत्नीची आणि चिमुकलीची केली हत्या…

प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला…

Video: जवानाने पोलिस दलात असलेल्या पत्नीला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं…

कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…

जवान चंदू चव्हाण यांचे आमरण उपोषण; पाहा प्रमुख मागण्या…

The post माजी सैनिकाने पत्नीची हत्या करून तुकडे केले अन् कुकरमध्ये शिजवले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka