Dailyhunt
प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला.

प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला.

नागपूर : लष्करात कार्यरत असलेल्या विवाहित जवानाने त्याच्या मैत्रिणीचा गळा आवळून खून केल्यानंतर मृतदेह जंगलात पुरला होता. या प्रकरणाचा उलगडा झाला असून, आरोपी जवानाला अटक करण्यात आली आहे.

आरोपी अजय वानखेडे याची ज्योत्सना आकरे हिच्याशी ओळख झाली होती. ज्योत्सनाचा घटस्फोट झाला होता. तिने दुसऱ्या लग्नासाठी विवाह संकेतस्थळावर नोंदणी केली होती. तिथेच दोघांची ओळख झाली. त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण झाले. अजय याने ज्योत्सना ऐवजी १९ मे रोजी दुसऱ्या मुलीशी लग्न केले. २८ ऑगस्टला ज्योत्सना मैत्रिणीकडे गेली होती. तिथून ती घरी परतलीच नाही. मैत्रिणींनी सांगितलं की, रात्री ती फोनवर बोलण्यासाठी गेले त्यानंतर आली नाही.

नातेवाईकांनी ज्योत्सना हिचा शोध घेतला पण ती सापडली नाही. अखेर १७ सप्टेंबरपर्यंत तिचा शोध घेतला. पोलिसांनी तिच्या मोबाईलचे डिटेल्स तपासले असता लोकेशन हैदराबाद ते नागपूर असे दिसले. एका ट्रकमध्ये मोबाईल टाकला होता. तो ट्रक हैदराबादला जाऊन पुन्हा नागपूरला आल्यानंतर ट्रकचालकाला सापडला. ट्रक चालकाने त्यातले सीम काढून दुसरे सीम घातले होते. मोबाईल फोन ट्रेस झाल्यानंतर पोलिसांनी ट्रकचालकाची चौकशी केली.

अजय याने ज्योत्सनाला भेटायला बोलावल्यानंतर तिला एका निर्जन स्थळी नेले आणि हत्या केली. मोबाईल फोनच्या सीडीआरमध्ये ज्योत्सना बेपत्ता झाली तेव्हा अजयसोबत बोलल्याचे आढळले. त्याची चौकशी केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरं दिली. त्याने गाडी बाहेरून आणि आतून सुद्धा धुतली असल्याचे समोर आले. शेवटी पोलिसांचा संशय बळावल्यानंतर त्याची कसून चौकशी करण्यात आली. अखेर मृतदेह पुरलेली जागा त्याने दाखवली. पोलिसांनी अजय याला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

लष्करातील जवानाच्या चार लग्नांची पत्नीने केली पोलखोल…

Video: जवानाचा मृतदेह मिळाला तब्बल ५६ वर्षांनी…

लव्ह जिहाद! पाकिस्तानातून होमगार्ड जवानाला आला फोन अन् म्हणाला…

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…

हृदयद्रावक! सुट्टीवर आलेल्या जवानावर काळाने घातला घाला…

The post प्रेम! जवानाने मैत्रिणीला भेटायला बोलावले अन् निर्जन स्थळी घेऊन गेला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka