Dailyhunt
मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात; म्हणाला.

मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात; म्हणाला.

मुंबईः कल्याणमध्ये मराठी कुटुंबियाला मारहाण झाल्याच्या प्रकरणाचे पडसाद आज (शुक्रवार) विधानसभेत उमटले. या प्रकरणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माज दाखवणाऱ्याचा माज उतरवू असे विधान केले होते.

फडणवीसांच्या या इशाऱ्यानंतर पोलिस अॅक्शन मोडमध्ये आली होती. त्यानुसार आता पोलिसांनी अखिलेश शुक्ला यांना ताब्यात घेतले आहे. शुक्ला यांना पोलिसांनी उचलण्यापुर्वी त्यांनी या घटनेवर आता मौन सोडले आहे.

“तुम्ही मराठी माणसं घाण आहात, मटण मच्छी खाता असे म्हणत अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मराठी लोकांना मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या स्वाधीन झाला आहे. कल्याण मराठी कुटुंब मारहाण केल्या प्रकरणी फरार असलेला आरोपी अकीलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात आला आहे. सोशल मीडियावर व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर त्याने पोलिसांना आत्मसमर्पण केल्याची माहिती दिली आहे.

अखिलेश शुक्ला यांनी आपले स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, ‘आमची पाचवी पिढी कल्याणमध्ये राहत असून, मी स्वतःला मराठी भाषिक समजतो. हा वाद शेजार धर्माशी संबंधित होता, पण तो भाषेचा मुद्दा बनवण्यात आला आहे. माझ्या पत्नीवर आधी हल्ला झाला आणि नंतर माझ्या मराठी भाषिक मित्रांनी मला वाचवले. तसेच वादादरम्यान देशमुख कुटुंबीयांनी अर्वाच्य भाषेचा वापर केला आणि माझ्या पत्नीला केसांनी पकडून मारहाण केली. आपल्या जुन्या शेजारीपणाच्या वादाला राजकीय वळण देण्याच्या प्रयत्नांचा निषेध केला. या घटनेची सखोल तपास करून सत्य बाहेर यावे.’

पोलिसांनी अखिलेश शुक्ला यांना ताब्यात घेतले आहे. याआधी मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणावर कल्याणचे पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी बोलताना अतुल झेंडे म्हणाले की, ‘मराठी कुटुंबाला झालेल्या मारहाण प्रकरणात सोशल मीडियाचे काही व्हिडीओ आमच्याकडे आले आहेत तर काही व्हिडीओ आम्हाला मिळाले आहेत. त्यानुसार आम्ही दोन आरोपीला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात कोणालाही सोडले जाणार नाही.’

कल्याणमधील संपूर्ण प्रकरण आहे तरी काय?
एमटीडीसीमध्ये कार्यरत असलेला अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत शेजारी-शेजारी राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावत असते. धूप लावल्यामुळे वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात हा धूर जातो. त्यामुळे गीता यांना हा धूर घरात येऊन या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला आणि घरात असलेली वयोवृद्ध आई हिला दम लागतो. या धुराचा त्रास होतो असं सांगितलं. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली.

एलिफंटा बोट दुर्घटनेची थरारक स्टोरी; दुर्घटनेतील मृतांची नावं समोर…

हृदयद्रावक! नाशिकचे कुटुंब उपचारासाठी मुंबईला अन् समुद्रात बुडाले…

मुंबईतील बेस्ट अपघातातील मृतांचा आकडा वाढला; पाहा मृतांची नावे…

मुंबई पुन्हा हिट ऍण्ड रन, मॉडेलचा जागीच मृत्यू…

धक्कादायक! मुंबईत पायलट युवतीने केली आत्महत्या; प्रियकर ताब्यात…

The post मराठी कुटुंबाला मारहाण करणारा अखिलेश शुक्ला पोलिसांच्या ताब्यात; म्हणाला… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka