Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मोबाईलवरून अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात दगड घालून केला खून.

मोबाईलवरून अल्पवयीन मुलाने महिलेच्या डोक्यात दगड घालून केला खून.

जालना: सातवीत शिकणाऱ्या मुलाने मोबाईल खराब केल्याच्या रागातून महिलेच्या डोक्यात दगड घालून हत्या केल्याची धक्कादायक घटना अंतरवाली टेंभी (ता. घनसावंगी) गावात घडली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसर हादरला आहे.

अल्पवयीन मुलाने हत्या केल्याचे जालना स्थानिक गुन्हे शाखेच्या तपासात उघड झाले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाने खुनाची कबुली दिली आहे.

घरा शेजारी राहणाऱ्या महिलेने फोन लावण्यासाठी या मुलाचा मोबाईल घेतला होता. मात्र तो पाण्यात पाडून खराब केल्याचा रागातून 13 वर्षाच्या मुलाने महिलेला संपवल्याची घटना घडली आहे. टेंभी अंतरवली गावामध्ये 25 मार्च रोजी मिराबाई बोंढारे (वय ४१) या महिलेच्या खुनाची घटना उघडकीस आली होती. पोलिस खुनाचा तपास करत होते. या महिलेच्या शेताजवळ राहणाऱ्या अल्पवयीन मुलाची चौकशी केली असता त्याने खूनाची कबुली दिली आहे. याप्रकरणी या मुलाला बाल सुधारगृहात पाठवण्यात येणार आहे.

शेतात काही दिवसांपूर्वी महिलेचा खून झाल्याची घटना उघडकीस आली होती. यावर जालना गुन्हा शाखेकडून तपास सुरु होता. संबंधित घटनेविषयी चौकशी सुरु असताना महिलेल्या शेताजवळ राहणाऱ्या मुलाची पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीतून या मुलानेच महिलेचा खून केल्याची कबूली दिली आहे. मोबाईलसाठी डोक्यात दगड घालून या मुलाने महिलेला संपवल्याच्या घटनेनंतर परिसर हादरला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

बीड पुन्हा हादरलं! प्रेमसंबंधातून युवकावर कोयत्याने सपासप वार…

पुणे! माजी नगरसेविकेच्या मुलाने आळंदीला नेऊन केलं लग्न अन् तीनवेळा गर्भपात…

चालकासोबत मालकीणीचं प्रेमसंबंध; महिलेच्या हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट…

प्रियकराने कारागृहात जाण्यापूर्वीच प्रेयसीसोबत उचललं टोकाचं पाऊल…

प्रेमकहाणीचा 'एक दुजे के लिए' स्टाईलने झाला शेवट…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka