पुणेः कुमार महाराष्ट्र केसरीसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर मुळशीचे नाव करणारा पैलवान विक्रम पारखी याचा आज (बुधवार) हृदयविकाराचा झटक्याने मृत्यू झाला. विक्रमचा 12 डिसेंबर विवाह होणार होता.
विक्रम मुळशीतील माण या गावचा रहिवाशी. कुस्ती क्षेत्रात मेहनत आणि कसरत घेत नाव कमावलेल्या पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे. विक्रमने राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक किताब पटकावले होते. अनेक पैलवानांना चितपट करणाऱ्या विक्रमला हृदयविकाराच्या झटक्याने गाठले अन् यातच त्याचा मृत्यू झालाय. त्याच्या अचानक जाण्याने सर्व मुळशी तालुक्यावर शोककळा पसरली आहे.
पैलवान विक्रम पारखी याने कुमार महाराष्ट्र केसरी पदावर आपले नाव कोरून मानाची गदा मिळवण्याचा पराक्रम केला होता. महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद द्वारे 2014 साली वारजे येथे आयोजित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य कुमार अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेत विक्रमने अजिंक्यपद मिळवले होते. या शिवाय विक्रमने अनेक राष्ट्रीय पदके आणि किताब पटकावले होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील कुस्ती स्पर्धेत सहभाग घेतला होता. हिंदकेसरी पैलवान अमोल बुचडे आणि विक्रम पारखीचे गुरू-शिष्याचे नाते होते. विक्रमचे वडील शिवाजीराव पारखी हे निवृत्त सैनिक असून, त्यांनी १९९९च्या कारगिल युद्धात लढा दिला होता. लष्करात राहून वडिलांनी देशाची सेवा केली होती. विक्रमच्या अचानक जाण्याने कुटुंबियांवर शोककळा पसरली आहे.
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात गरबा किंगने दांडिया खेळताना मुलासमोरच सोडला जीव…
हृदयद्रावक! पुणे जिल्ह्यात नवविवाहित दांपत्याचा डंपरच्या धडकेत जागीच मृत्यू…
हृदयद्रावक! पुणे शहरात चहा पित असताना डोक्यावर पडली झाडाची फांदी…
हृदयद्रावक Video! पुणे शहरात जुळ्या मुलींचा एकाचवेळी दुर्देवी मृत्यू…
हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू…
The post मुळशी हळहळली! विवाहापूर्वी पैलवानाचा हृदयविकाराने मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

