गोंदियाः गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सुर्यवंशी तीन महिन्यांपूर्वी पोलिसांत भरती झाली होती. स्मिता सुर्यवंशी यांच्या कुटुंबात आनंदाने गहिवरले होते. मात्र, सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांचा आनंद फार काळ टिकला नाही.
गोंदियाच्या कोहमारा गोंदिया मार्गावर डव्वा-खजरी गावाजवळ शुक्रवारी (ता. २९) दुपारी झालेल्या शिवशाही एस.टी. बसच्या भीषण अपघातात 11 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये अर्जुनी मोरगाव येथील स्मिता सुर्यवंशी या पोलिस शिपाई महिलेचा समावेश आहे. या अपघातात मृत्यू झालेली स्मिता सुर्यवंशी यांचे पती पोलिस विभागातच कार्यरत होते. त्यांचे यापूर्वीच आजाराने निधन झाले होते. आपले सासू सासरे व एका छोट्याशा बाळासह हलाखीचे जीवन जगत असताना स्मिता हिला पोलिस मुख्यालय गोंदिया येथे पोलिस शिपाई म्हणून दोन तीन महिन्यापूर्वीच नोकरी मिळाली होती. परिवारांना भेटून स्मिता आज 29 नोव्हेंबर ला आपल्या नोकरीवर जाण्यासाठी अर्जुनी मोरगाव वरुन साकोलीला गेल्या आणि गोंदियाला जाण्यासाठी याच बसने जात असता हा अपघात घडल्याने स्मिता यांचा जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे सुर्यवंशी कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
दरम्यान, गोंदिया एसटी अपघातातील मृतांना तातडीने 10 लाख रुपयांची मदत देण्याचे आदेश काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परिवहन प्रशासनाला दिले आहेत. सध्या मृतांचा आकडा 11 वर असला तरी अनेक प्रवासी गंभीररित्या जखमी झाले आहेत.
शिवशाही बस अपघातात मृत्यू पावलेल्या प्रवाशांची नावे पुढीलप्रमाणे-
1) स्मिता विक्की सुर्यवंशी, वय- 32 वर्ष, राहणार- अर्जुनी मोरगाव, जि.गोंदिया
2) मंगला राजेश लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
3) राजेश देवराम लांजेवार, राहणार- पिपरी, जि.भंडारा
4) कल्पना रविशंकर वानखेडे, वय- 65 वर्ष, राहणार- वरोरा, जि.चंद्रपूर
5) रामचंद्र कनोजे, वय- 65 वर्ष, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
6) अंजिरा रामचंद्र कनोजे, राहणार- चांदोरी, ता.साकोली, जि.भंडारा
7) आरिफा अजहर सय्यद, वय- 42 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
8) अजहर अली सय्यद, वय- 45 वर्ष, राहणार- घोटी, ता.गोरेगाव, जि.गोंदिया
9) नयना विशाल मिटकर, वय- 35 वर्ष, राहणार- बेसा, नागपूर
१०,११) दोन मृत्यू पावलेल्या 2 प्रवाशांची अद्याप ओळख पटलेली नाही
गोंदियात शिवशाही बसला भीषण अपघात! ११ जणांचा जागीच मृत्यू…
पोलिसकाका विनोद आचरेकर यांचा खून; मृतदेह आढळला नग्नावस्थेत…
लग्न करुन परतताना भीषण अपघात; नवरा-नवरीसह 7 जणांचा मृत्यू…
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात! पुण्याहून निघालेले पती-पत्नीसह तिघे ठार…
नागपूरवरून निघालेल्या बसला भीषण अपघात, 9 जणांचा मृत्यू…
जालना येथे बस आणि ट्रकचा भीषण अपघात; 5 ठार, 14 जखमी
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर भीषण अपघातात पाच भाविकांचा मृत्यू तर अनेक जखमी…
The post हृदयद्रावक! पतीच्या निधनानंतर पोलिसात भरती अन् शिवशाही बस अपघातात मृत्यू… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

