पुणे : गँगस्टर शरद मोहोळ याची लग्नाच्या वाढदिवशीच घराजवळ हत्या करण्यात आली. शरद मोहोळ सोबत असलेल्या साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर आणि त्याच्या इतर साथीदारांनी गोळीबार केल्याची माहिती पुढे आली आहे.
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून याबाबतचा तपास सुरू आहे. शरद मोहळ हत्याप्रकरणात पोलिसांकडून न्यायालयात महत्त्वाची माहिती सादर करण्यात आली आहे. मोहळच्या हत्येप्रकरणात अटक करण्यात आलेले दोन्ही वकील हत्येनंतर दीड तास आरोपींसोबत होते, त्यांनी एकत्र प्रवास केला. आरोपींना वकील खेड शिवापूर टोलनाक्यावर जाऊन भेटले, अशी माहिती पोलिसांनी न्यायालयात सादर केली. त्यानंतर न्यायालयाने या दोन्ही वकिलांच्या पोलिस कोठडीमध्ये 11 जानेवारीपर्यंत वाढ केली आहे. आरोपी पोलिसांना शरण येणार होते, असा दावा या वकिलांकडून करण्यात आला, मात्र हा दावा पोलिसांनी फेटाळून लावला आहे. शरणच यायचं होतं तर मग त्यांनी सीम कार्ड का बदलले? असा प्रश्न पोलिसांकडून उपस्थित करण्यात आला आहे.
या प्रकरणातील प्रमुख सहा आरोपी 15 डिसेंबरला भेटले, या भेटीनंतर त्यांनी वकील रवींद्र पवार याला फोन केला. त्यानंतर पाच जानेवारीला शरद मोहळची हत्या करण्यात आली. हत्येनंतर आरोपींनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर खेड शिवापूर टोलनाक्यावर वकील रवींद्र पवार आणि वकील संजय उडान त्यांना जाऊन भेटले. त्यांनी आरोपींसोबत दीड तास प्रवास केला, अशी माहिती न्यायालयात पोलिसांकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, 5 जानेवारी 2024 रोजी दुपारी दीडच्या सुमारास कुख्यात गुन्हेगार शरद मोहोळ याच्यावर घराबाहेर गोळीबार करण्यात आला. मोहोळच्या सावलीनेच त्याचा घात केला त्याच्या साथीदारांनीच पाठीत खंजीर खुपसला. मुन्ना पोळेकर हा शरद मोहोळचा सच्चा दोस्त होता. शरद मोहोळचा पाठीराखा बनून मोहोळच्याच पाठीत त्याने खंजीर खुपसला.
कोण आहे मुन्ना पोळेकर?
मुन्ना उर्फ साहिल पोळेकर (वय 20, राहणार मुळशी) हा मोहोळ याचा जवळचा मित्र. मुन्नाचे आणि शरद मोहोळचे पैशांच्या देवाणघेवाणीतून वाद झाले. मात्र हेच प्रमूख कारण नव्हते. हा वाद फार जुना आहे. पुण्याजवळील मुळशी तालुक्यातील एका जमीनीच्या वादातून ही हत्या झाल्याचे बोलले जात आहे. नामदेव कानगुडे हा मुन्नाचा मामा. मोहोळचा काटा काढायचे ठरले तेव्हा कानगुडेही यात सहभागी झाला. जमीनीचा व्यवहारातून मुन्नाच्या मामाचे मोहोळ सोबत खटके उडाले होते. भाचाच्या गुन्ह्यात मामानेही साथ दिली आणि मोहोळला संपवण्याचा डाव आखला.
मुन्ना कसा गेला मोहळच्या गँगमध्ये…
मोहोळच्या हत्येच्या डाव फत्ते करण्यासाठी मुन्नाला मोहोळच्या टोळीत पाठवले. मुन्ना हा मोहोळचा पाठीराखा होता पण खऱ्या अर्थाने तो दुसऱ्या गटाचा टीपर होता. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुख्य आरोपी साहिल उर्फ मुन्ना पोळेकर हा मोहोळ गँगच्या सोबत महिन्याभरापासून टोळीचा सदस्य म्हणून काम करत होता. जेव्हा ही घटना घडली त्या दिवशी सकाळपासून मुन्ना पोळेकर आणि शरद मोहोळ हे सोबतच होते अशीही माहिती समोर येत आहे. 5 जानेवारी हा लग्नाचा वाढदिवस होता. दगडूशेठ गणपतीच्या दर्शनाला तो निघाला होता. घरापासून काही पावलं दूर आला आणि साथीदारांनीच त्याचा गेम केला.
शरद मोहोळची पत्नी कडाडली; नवरा वाघ होता तर मी वाघीण आहे…
कुख्यात गुंड शरद मोहोळ प्रकरण! पोलिसांनी आवळल्या आठही जणांच्या मुसक्या…
पुण्यातील कुख्यात गुंड शरद मोहोळ याचा लग्नाच्या वाढदिवशी हल्ल्यात मृत्यू…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post मुळशी पॅटर्न! गँगस्टर शरद मोहोळ याच्या हत्येमागची INSIDE STORY… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

