Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
मुंबई पोलिसांनी हत्येचा कट उधळला; बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक.

मुंबई पोलिसांनी हत्येचा कट उधळला; बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक.

मुंबई : मुंबई पोलिसांनी बिश्नोई टोळीच्या गुंडांच्या मुसक्या आवळल्या आहेत. मुंबईतील एका उद्योगपतीच्या हत्येसाठी बिष्णोई गँगचे शूटर्स मुंबईत आले होते. मात्र, मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने 5 आरोपींना अंधेरी येथून अटक केली आहे.

बॉलिवूड अभिनेता सलमान खान याच्या घरावर हल्ला केल्यानंतर पोलिसांनी बिश्नोई गँगच्या काही गुंडांना अटक केली होती. त्यानंतर राज्याचे माजी मंत्री बाबा सिद्दिकी यांच्या हत्येतही बिश्नोई गँगच्या शूटर्सना अटक करण्यात आली. त्यानंतर आता पुन्हा बिश्नोई गँगच्या 5 जणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या मारेकऱ्यांच्या रडारवर आणखी कोण होते, याचीही चौकशी केली जात आहे. आरोपींच्या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.

बिश्नोई गँगकडून उद्योगपतीची हत्या करण्याचा डाव आखला होता. मात्र, मुंबई पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने हा डाव उधळून लावला. अटक केलेल्या 5 जणांकडून 5 ते 6 देशी पिस्तूल जप्त करण्यात आले आहेत. आरोपींच्या रडारवर असलेल्या उद्योगपतीची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

सदस्यांची यादी तयार करणाऱ्या लॉरेन्स बिश्नोई गँगवर पुणे पोलिसांची कारवाई

बाबा सिद्दिकी यांच्या हत्या प्रकरणात गौप्यस्फोट; चॅट अन् डायरी…

अभिनेता सलमान खान याची सुपारी घेणाऱ्याला पानिपतमधून केली अटक…

अभिनेता सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीने घेतला जगाचा निरोप…

अभिनेता शाहरुख खानला सरकारने पुरवली Y+ स्कॉट सुरक्षा; कारण…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka