Dailyhunt
मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार.

मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार.

मुंबई : मुंबईतील एका नामांकित शाळेतील शिक्षिकेने (वय ४०) विद्यार्थ्यावर (वय १६) लैंगिक अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी आरोपी शिक्षिकेविरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला असून, अटक केली आहे.

या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

आरोपी महिला ही इंग्रजी विषयाची शिक्षिका आहे. ती विवाहित असून तिला एक मूल आहे. डिसेंबर 2023 मध्ये शाळेतील एका कार्यक्रमासाठी डान्स बसवण्यात आला होता. यामध्ये आरोपी शिक्षिकेचा सहभाग होता. डान्सच्या सरावावेळी ही शिक्षिका पीडित मुलाकडे आकर्षित झाली. त्यानंतर तिने या मुलासोबत जबरदस्तीने जानेवारी 2024 मध्ये बळजबरी शरीरसंबंध प्रस्थापित केले असल्याची माहिती तक्रारीत नमूद करण्यात आली आहे. त्यानंतर वर्षभर त्याच्यावर लैंगिक अत्याचार सुरू ठेवला होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित विद्यार्थी शिक्षिकेसोबत संबंध ठेवण्यास तयार नव्हता. त्याने सुरुवातीला शिक्षिकेला नकार दिला होता. मात्र, त्यानंतर या शिक्षिकेने आपल्या एका शाळेबाहेरील मैत्रिणीला फोन करत मध्यस्थी करण्याची विनंती केली. तिने या पीडित विद्यार्थ्याला फोन करत अधिक वयाची महिला आणि कमी वयाची मुले यांच्यातील संबंध सामान्य असल्याचे सांगितले. त्याशिवाय, तुम्ही दोघं एकमेकांसाठीच बनला आहात, असेही सांगितले. त्यानंतर हा मुलगा शिक्षिकेला भेटण्यास तयार झाला होता. पोलिसांनी मध्यस्थी करणाऱ्या मैत्रिणीविरोधातही पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

पहिल्या भेटीच्या वेळी आरोपी शिक्षिकेने कारमधून अल्पवयीन विद्यार्थ्याला एका निर्जन स्थळी नेले आणि त्याच्यावर अत्याचार केला. त्यानंतरच्या काही दिवसांत मुलाच्या मनावर या घटनेने परिणाम झाला. मात्र, शिक्षिकेने त्याला anti-anxiety औषधे दिली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर जवळपास वर्षभर या शिक्षिकेने या विद्यार्थ्यावर दक्षिण मुंबई आणि मुंबई विमानतळाजवळील काही तारांकित हॉटेलमध्ये नेत त्याच्यावर लैंगिंक अत्याचार केला. त्याच्यावर अत्याचार करण्याआधी शिक्षिकेकडून त्याला जबरदस्तीने दारू पाजली जायची. मुलाच्या वागण्यातील बदल लक्षात घेता पालकांनी त्याच्याकडे विचारणा केल्यानंतर पीडित विद्यार्थ्याने पालकांना घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. मात्र, आता शाळा संपण्यास काही महिनेच शिल्लक असून शिक्षिकादेखील आता त्रास देणार नाही, असे वाटले होते.

मुलाने बोर्डाची परीक्षा उत्तीर्ण केली आणि शाळा सोडली, परंतु तो नैराश्यात बुडाला, असे पोलिसांनी सांगितले. शिक्षिकेने त्याच्या एका घरातील मदतनीसाच्या माध्यमातून पुन्हा त्याच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि त्याला भेटण्यास सांगितले. त्यानंतर कुटुंबाने आमच्याशी संपर्क साधण्याचा आणि गुन्हा दाखल करण्याचा निर्णय घेतला असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले. दरम्यान, पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास करत आहेत.

शिक्षकाने काढली शाळेतच विद्यार्थिनीची छेड; उसळली संतापाची लाट…

धक्कादायक! शिक्षिकेच्या नवऱ्याकडून विद्यार्थिनी राहिली गरोदर…

शाळेत सुटला संयम! शिक्षिकेला मारली पाठीमागून मिठी अन् म्हणाला…

प्रेमविवाह! मुख्याधापिकेने केला शिक्षक नवऱ्याचा खून; विद्यार्थ्यांना घेतले सोबत अन्…

शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ…

मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

The post मुंबईत शिक्षिकेने विद्यार्थ्याला दारू पाजून करत राहिली लैंगिक अत्याचार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka