Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ.

शिक्षिका अल्पवयीन विद्यार्थ्यापासून राहिली गरोदर अन् काढला पळ.

हमदाबाद (गुजरात): सुरत शहरातील एक शिक्षिका (वय २३) 13 वर्षांच्या विद्यार्थ्यासोबत पळून गेली होती. पोलिसांना महिला शिक्षिका सापडली तेव्हा तिने धक्कादायक दावा केला. अल्पवयीन विद्यार्थ्यापासून आपण पाच महिन्यांची गरोदर असल्याचा दावा तिने केला आहे.

या घटनेनंतर खळबळ उडाली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

राजस्थान-गुजरात सीमेजवळ असलेल्या बनासकांठा जिल्ह्यातील शामलाजीजवळ एका बसमधून मुलासह पळून जाणाऱ्या शिक्षिकेला पोलिसांनी अटक केली. पोलिसांपासून वाचण्यासाठी, महिला शिक्षिकेने तिचा मोबाईल फोन बंद केला होता, परंतु तिच्याकडे असलेला दुसरा मोबाईल फोन चालू होता आणि तो ट्रॅक करून पोलिसांनी तिला शोधून काढले. पोलिस तपासात असे दिसून आले की, ती महिला अल्पवयीन मुलाचे शारीरिक शोषण करत होती आणि दोघांमध्ये अनेक वेळा शारीरिक संबंध प्रस्थापित झाले. पोलिसांनी आरोपी महिलेविरुद्ध अपहरण आणि पोक्सो (लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण) कायद्याच्या कलमांखाली गुन्हा दाखल केला आणि तिला अटक केली आहे.

आरोपी महिला एका सरकारी प्राथमिक शाळेत काम करते. ही महिला शिक्षिका गेल्या तीन वर्षांपासून तिच्या घरी अल्पवयीन विद्यार्थ्याला शिकवत होती. दोघेही सुरतमधील ‘पर्वत पाटिया’ भागात असलेल्या एका अपार्टमेंटच्या वेगवेगळ्या मजल्यांवर राहतात. महिला तिसऱ्या मजल्यावर राहते, तर मुलाचे कुटुंब दुसऱ्या मजल्यावर राहते. विद्यार्थ्याचे कुटुंब राजस्थानचे आहे, तर शिक्षिका गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील आहे.

25 एप्रिल रोजी दोघेही त्यांच्या घरातून बेपत्ता झाले होते. यानंतर मुलाच्या वडिलांनी पोलिसात तक्रार दाखल केली. आपला मुलगा शिकवणीला जाणाऱ्या शिक्षिकेसोबत पळून गेल्याचे मुलाच्या वडिलांनी पोलिसांना सांगितले. यानंतर पोलिसांनी सोसायटीमधील सीसीटीव्ही फुटेज तपासले तेव्हा मुलगा शिक्षिकेसोबतच गेल्याचे दिसले. पोलिसांनी दोघांचा शोध सुरू केला आणि 30 एप्रिलला म्हणजे बुधवारी पहाटे, दोघांनाही राजस्थान सीमेजवळील बसमधून पकडण्यात आले. दोघेही अहमदाबादला जाणाऱ्या बसमधून प्रवास करत होते.

‘शिक्षिकेची चौकशी केली तेव्हा तिने मुलाशी शारीरिक संबंध ठेवल्याची कबुली दिली. आम्ही अपहरण तसेच पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. शिक्षिका आणि विद्यार्थी दोघांचीही वैद्यकीय तपासणी केली जाईल’, असे सुरतचे पोलिस उपायुक्त (डीसीपी) भागीरथ सिंह गढवी यांनी सांगितले.

शिक्षकाचे 3-3 शिक्षिकांसोबत अश्लील चाळे; Video Viral…

शिक्षिकेने ओढलं विद्यार्थिनीच्या वडिलांना प्रेमाच्या जाळ्यात अन् स्वतःच अडकली…

मुख्याध्यापक आणि शिक्षक एकाचवेळी शिक्षिकेच्या प्रेमात झाले वेडेपिसे अन्…

Video : शाळेमध्ये शिक्षक-शिक्षिकेचे अश्लिल चाळे झाले कैद…

विद्यार्थ्यासोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या शिक्षिकेला 30 वर्षांची शिक्षा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka