Dailyhunt
नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या.

नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या.

नागपूरः नागपूरच्या कपिल नगर पोलिस स्टेशन हद्दीत चारित्र्याच्या संशयावरून पतीनेच आपल्या पत्नीचीची हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दोन वर्षांपूर्वी या जोडप्याचा प्रेमविवाह झाला होता.

मन्नत कौर विर्क असे मृत पत्नीचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपी दिलप्रीत सिंग विर्क याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

आरोपी दिलप्रीत विर्क आणि मृत मन्नत कौर यांचा 2022 मध्ये प्रेमविवाह झाला होता. मात्र मागील काही दिवसापासून दोघांमध्ये सतत खटके उडत होते. त्यातच मंगळवारी (ता. 25) रात्री दोघांमध्ये मोठा वाद झाला. या वादातून संतापाच्या भरात आरोपी दिलप्रीत सिंगने पत्नी मन्नतवर लोखंडी रॉडने वार करून तिला ठार केले. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलिस करत आहे.

विशेष म्हणजे हत्येच्या एक दिवसापूर्वीच मन्नत विर्क हिने आपल्या भावासह पोलिस स्टेशनमध्ये धाव घेत मनप्रीत विरोधात तक्रार दाखल केली होती. आपल्या जीवाला पती दिलप्रीत पासून धोका असल्याची तक्रार मन्नतने दिली होती. दुसऱ्याच दिवशी मन्नत विर्कची हत्या झाली. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून, घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.


पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीला जुगाराचा नाद होता. त्याचबरोबर तो पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. या कारणामुळे दोघांमध्ये वाद होत होता. मृत मन्नत कौर मॉडर्न विचारांची होती तसेच सोशल मीडियावर खूप सक्रीय असायची. तसेच ती जिममध्ये जात होता. यावरून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद व्हायचे. चारित्र्याच्या संशयावरून वारंवार होणाऱ्या वादाला कंटाळलेली मन्नत त्याच्यापासून दूर माहेरी राहत होती आणि त्याच्यापासून ती घटस्फोट घेऊ इच्छित होती. पण त्याला हे मान्य नव्हते. या दाम्पत्याला २ वर्षाचा मुलगाही आहे.

विक्की आधी गड्डीगोदाम येथे कारच्या वस्तू विक्रीचे दुकान चालवत होता. तेथे व्यवसाय तोट्यात गेल्याने त्याने कपिलनगर येथे किंग्स एसेसरीज नावाने दुकान सुरू केले. गेल्या पाच वर्षापासून विक्की आणि मन्नत दरम्यान प्रेम संबंध होते. २०२२ मध्ये दोघांनी लव्ह मॅरेज केले. कुटूंबीय यामुळे नाराज होते. मात्र विक्की आपल्या पत्नीला घेऊन कुटूंबासोबतच रहात होता. घरात वाद सुरू झाल्यानंतर काही महिन्यापूर्वी मन्नतच्या सांगण्यावरून विक्कीने पंचमवैद्य आर्य सोसायटीत एक फ्लॅट भाड्याने घेतला. मागील काही दिवसांपासून त्यांच्यातील वाद विकोपाला गेले होते.

विक्कीला कोणीतरी सांगितले होते की, त्याची पत्नी मन्नत आणि जरीपटका परिसरातील कुख्यात गुन्हेगार भुऱ्या यांच्यात अनैतिक संबंध आहेत. विक्की आपल्या आई-वडिलांसोबत त्यांच्या घरात रहात होता. जेव्हा कधी फ्लॅटवर जात होता, तेव्हा मन्नतशी वाद होत होता. त्याला दारूचे व्यसन होते. दारूच्या नशेत तो नेहमी तिच्या चारित्र्यावर संशय घेत होता. मंगळवारी सकाळीही दोघांमध्ये यावरून वाद झाला होता. विक्कीने तिला मारहाण केली. मन्नतने आपल्या कुटूंबाला माहिती दिली. मन्नतने आपला भाऊ विशालसोबत कपिलनगर पोलिस ठाणे गाठून तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी अदखलपात्र गुन्गा नोंदवला व काही तासात विक्कीला सोडून दिले.

रात्री तो पुन्हा फ्लॅटवर गेल्यावर वाद सुरू झाला. मन्नतने आपल्या मदतीसाठी जिम मधील मित्र लाजरस इमानुअल याला व्हिडिओ कॉल केला. यावेळी विक्कीने लोखंडाच्या रॉडने मन्नतच्या डोक्यावर जोरत वार केला. वार वर्मी लागल्याने मन्नत जागीच कोसळली व तिचा मृत्यू झाला. मन्नत निपचिप पडल्यानंतर तो तेथून पसार झाला. मन्नत आणि विक्कीशी संपर्क होत नव्हता. नातेवाईकांनी त्यांचा शोध सुरू केला. रात्री ११ वाजता कुटूंबीयतिच्या फ्लॅटवर गेले मात्र दरवाजाला कुलूप होते. कपिलनगर पोलिसांना याची माहिती दिल्यानंतर पोलिस कुटूंप तोडून आत गेले. आतील दृष्य पाहून सर्वांना धक्का बसला. मन्नत रक्ताच्या थारोळ्यात मरुन पडली होती. पंचनामा करून मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला गेला. हत्या केल्यानंतर विक्की बारमध्ये जाऊन दारू पीत बसला. रात्री ३ वाजता त्याला अटक करण्यात आली.

बहिणीशी प्रेमसंबंध असल्याच्या संशयातून चाकूने सपासप वार करून हत्या…

TCS मॅनेजर सुरभी जैन आत्महत्या प्रकरणात नवीन खुलासा…

प्रेम आणि धमकी! FB लाइव्ह करत युवकाने मारली नदीत उडी अन्…

क्लास वन अधिकारी अन् सासऱ्याची सुपारी; कसा उलगडा झाला पाहा…

व्हॅलेंटाईन डेलाच प्रेयसीवरील संशयातून मित्राची हत्या…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post नागपूर हादरलं! प्रेमविवाह अन् चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka