पुणे : पोलिस दलामध्ये प्रदीर्घ सेवा केल्यानंतर सेवानिवृत्त होत असलेल्या पोलिस अधिकाऱ्यांसाठी 'पोलिसकाका'ने एक विशेष 'सन्मान योजना' आखली आहे. सेवानिवृत्त होत असलेल्या अधिकाऱ्याची सविस्तर अशी मुलाखत घेऊन त्यांचा जीवनप्रवास आणि अनुभव नव्या पिढीला समजण्यासाठी शब्दबद्ध करून 'पोलिस अधिकारी व्हायचंय?' या विशेष पुस्तकामध्ये प्रकाशित केली जाणार आहे.
महाराष्ट्र पोलिस दलाच्या स्थापनेपासून पोलिस नागरिकांच्या संरक्षणासाठी रात्रं-दिवस रस्त्यावर उभे आहेत. कोरोना आणि लॉकडाऊन काळात हे प्रामुख्याने पाहायला मिळाले. लॉकडाऊन काळात पोलिस रात्रं-दिवस रस्त्यावर उभे होते. यावेळी नागरिकांचेही प्रेम पोलिसांना मिळाले. सण, समारंभ असो की कुटुंबातील वाढदिवस. पण, पोलिसांना आपले कर्तेव्य पार पाडावे लागते.
पोलिसाच्या कणखर मनातही दडलेला असतो एक कवी, लेखक, गायक आणि हरहुन्नरी कलाकारही. ऊन, वारा, पाऊस, थंडी झेलत राहते ती वर्दी. अहोरात्र आपल्या मदतीसाठी तत्पर असतात ते पोलिस. पण, पोलिसांची नेहमी एकच बाजू समोर येते. अनेकदा दुसरी बाजू समोर येतही नाही. यामागे वेगवेगळी कारणे असू शकतात. पण, पोलिसांचे चांगले कार्य समाजासमोर येणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. पोलिसांची उत्कृष्ठ कामगिरी आणि त्यांनी केलेल्या कामाची दखल घेण्यासाठी www.policekaka.com या संकेतस्थळाची २०२०मध्ये निर्मिती करण्यात आली आहे. पोलिसांच्या हक्काच्या वेबसाईटला गेल्या चार वर्षांमध्ये कोट्यावधी वाचकांनी वेबसाईटला भेट दिली आहे. शिवाय, हा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. टीम पोलिसकाकाने विविध पोलिस अधिकाऱ्यांच्या सविस्तर मुलाखती घेतल्या आहेत. पोलिसकाका पुस्तकाचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते प्रकाशन झाले आहे. शिवाय, संबंधित लेख वेबसाईट व सोशल मीडियावर व्हायरल केले असून, त्यांना मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी मिळत आहे.
पोलिस दलामध्ये प्रदीर्घ अशी सेवा केल्यानंतर अनेकजण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असतात. पोलिस दलामध्ये कार्यरत असताना अनेक गुन्हे उघड केलेले असतात. विशेष पुरस्कार मिळविलेले असतात. पण, प्रसिद्धी न मिळाल्यामुळे अनेकजण पडद्यामागेच राहतात. पण, सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असताना सविस्तर अशी मुलाखत घेऊन अधिकाऱ्याचा जीवन प्रवास ‘पोलिस अधिकारी व्हायचंय?’ या पुस्तकामध्ये छापला जाणार आहे. शिवाय, विशेष पुरस्कार देऊन सन्मानित केले जाणार आहे. संबंधित पोलिस कर्मचारी, पोलिस अधिकारी यांना हे पुस्तक अनेकांना भेट म्हणून देता तर येईलच. शिवाय, घरामध्ये संग्रहीस्वरूपात कायमस्वरूपी राहणार आहे. याबरोबरच पोलिस दलात प्रवेश करू इच्छिणाऱयांना, MPSC, UPSCचा अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांना या मुलाखती प्रेरणादायी ठरणार आहेत.
‘पोलिस अधिकारी व्हायचंय?’ या पुस्तकासाठी आजच आपली मुलाखत नोंदवा…
अधिका माहितीसाठी संपर्क:
संतोष धायबर – 9881242616
संदिप कद्रे – 98508 39153
व्हॉट्सऍप – 92721 94933
ई-मेल – policekaka100@gmail.com
वेबसाईट – www.policekaka.com
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!
police-adhikari-hoyacheyपुस्तक Online खरेदी कराः
पुस्तकाचे नावः पोलिस अधिकारी व्हायचय?
गुगल फॉर्म:https://surl.li/sdkrp
किंमत – ३०० रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153
Loading…
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष ‘सन्मान योजना’ appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

