Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नगर हादरलं! विद्यार्थिनी घरात एकटी असताना शिक्षक यायचा अन्.

नगर हादरलं! विद्यार्थिनी घरात एकटी असताना शिक्षक यायचा अन्.

अहिल्यानगर: अहिल्यानगर जिल्ह्यातील घारगावमध्ये शिक्षकी पेशाला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. एका शिक्षकाने शाळेतील एका आठवीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनीवर वारंवार अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे.

पीडित मुलगी गर्भवती असल्याचे वैद्यकीय तपासणीत निष्पन्न झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.

अमोल बाबासाहेब भोसले (वय २३, रा. संगमनेर) असे आरोपी शिक्षकाचे नाव आहे. मुलगी सातवीत असतानापासूनच भोसले याने तिच्याशी जवळीक वाढवण्यास सुरुवात केली होती. भावनिक आधार देण्याच्या नावाखाली त्याने प्रेमाचे संदेश पाठवून तिचा विश्वास संपादन केला. यानंतर त्याने तिच्यावर अत्याचाराला सुरुवात केली. डिसेंबर २०२४ ते जानेवारी २०२६ या प्रदीर्घ कालावधीत हा अत्याचाराचा प्रकार सुरू होता. जेव्हा मुलगी घरी एकटी असायची, तेव्हा आरोपी तिच्या घरी जाऊन तिच्यावर वारंवार अत्याचार करायचा. गेल्या दोन वर्षांपासून चाललेला हा गंभीर प्रकार कोणाच्याही लक्षात आला नव्हता.

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, काही दिवसांपूर्वी मुलीला पोटदुखीचा त्रास होऊ लागल्याने तिला पिंपरी-चिंचवड येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तिथे डॉक्टरांनी केलेल्या तपासणीत ती गर्भवती असल्याचे समोर आले. घटनेचे गांभीर्य ओळखून वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली आणि हा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी आरोपी अमोल भोसले याच्यावर भारतीय न्यायसंहितेतील संबंधित कलमे आणि पोक्सो (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. झिरो क्रमांकाने नोंदवलेला हा गुन्हा पुढील तपासासाठी घारगाव पोलिसांकडे वर्ग करण्यात आला. घारगाव पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवून आरोपी शिक्षकाला बेड्या ठोकल्या आहेत. घटनेचा पुढील तपास केला जात आहे.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka