Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी आली असताना शिक्षकाने केले गैरवर्तन; बेदम चोप.

विद्यार्थिनी परीक्षा देण्यासाठी आली असताना शिक्षकाने केले गैरवर्तन; बेदम चोप.

छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगरमधील बजाजनगर परिसरातील एका परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्यासाठी आलेल्या एका विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याच्या आरोपावरून शिक्षकाला विद्यार्थिनीच्या नातेवाईकांसह संस्था चालकाने बेदम मारहाण केल्याची घटना घडली.

संबंधित शिक्षक परीक्षा केंद्रावर गार्डिंगसाठी नियुक्त होता. विद्यार्थिनीशी गैरवर्तन करून तिचा मोबाईल क्रमांक घेतल्याचा तसेच वारंवार फोन करून त्रास दिल्याचा आरोप मुलीच्या नातेवाईकांनी केला आहे. घडलेला प्रकार विद्यार्थिनीने तत्काळ घरातील व्यक्तींना सांगितला. त्यानंतर नातेवाईकांनी संस्था चालकासमोर संबंधित शिक्षकाला बोलावले. त्यावेळी त्याने चूक झाल्याचे कबूल करत माफी मागितली. यानंतर संतप्त नातेवाईकांनी त्याला चोप दिला.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, संबंधित शिक्षकाने इतर विद्यार्थिनींनाही त्रास दिला असावा, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे. घटनेनंतर संबंधित शिक्षकाला तत्काळ निलंबित करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

या घटनेनंतर परीक्षा केंद्र परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. गैरवर्तनाच्या आरोपांची सखोल चौकशी केली जाईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Valentine Day ला शिक्षकाने विद्यार्थिनीला बाहेर बोलवलं अन्…

कोल्हापूर! शिक्षकाला महिलेच्या घरात रंगेहाथ पकडले अन्…

शिक्षकाने केला विद्यार्थिनीचा लैंगिक छळ; रात्रीच्या वेळी भेटायला बोलवायचा अन्…

सोलापूर! शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; आता तु चांगली सापडली…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka