Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नगरमध्ये 4 सख्ख्या बहि‍णींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार.

नगरमध्ये 4 सख्ख्या बहि‍णींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार.

हिल्यानगर : एकाच कुटुंबातील चार बहिणींवर एकाने लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना राहुरी तालुक्यात घडली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून हा आरोपी चारही बहिणींचे शारीरिक शोषण करत होता.

धक्कादायक म्हणजे आरोपी हा त्यांचा लांबचा नातेवाईक आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीसह त्याच्या पत्नीला देखील अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

आई-वडील विभक्त झाल्याने एका कुटुंबातील चार बहिणींचा सांभाळ करण्याची जबाबदारी दूरच्या नातेवाईकाकडे सोपवण्यात आली होती. मात्र, मुलींचे रक्षण करण्याऐवजी याच पालनकर्त्यानेच त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला आहे. या प्रकरणी राहुरी पोलिसांनी नराधम आरोपीसह त्याच्या पत्नीला अटक केली असून, त्यांना न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे. पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी या कारवाईची माहिती दिली आहे.

स्नेहालय संस्थेच्या उडान प्रकल्पाच्या कार्यकर्त्यांनी या प्रकरणाचा पर्दाफाश केला. पीडित मुलींपैकी सज्ञान असलेली एक मुलगी काही दिवसांपूर्वी बहिणींना भेटण्यासाठी आली होती. यावेळी आरोपीने पुन्हा तिच्यावर अत्याचार केला. पीडित मुलीने हा प्रसंग आपल्या पतीला सांगितला, त्यानंतर दोघांनी तातडीने स्नेहालय संस्थेशी संपर्क साधला. संस्थेच्या कार्यकर्त्यांनी हा प्रकार राहुरी पोलिसांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर पोलिसांनी वेगाने हालचाल करत चौघी मुलींची सुटका केली आणि आरोपी दांपत्याला बेड्या ठोकल्या.

दरम्यान, चौघी पीडित बहिणी नाशिक जिल्ह्यातील असून, त्यापैकी एक मुलगी सज्ञान आहे, तर इतर तिघी अनुक्रमे १६, १४ आणि १० वर्षांच्या अल्पवयीन आहेत. चार महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या सज्ञान मुलीवर आरोपीने वारंवार लैंगिक अत्याचार केला होता. नंतर या पीडितेच्या धाडसामुळेच प्रकरण उघडकीस आले आहे. आरोपीने केवळ तिच्यावरच नव्हे, तर तिच्या तीन अल्पवयीन बहिणींवरही अनेक वेळा लैंगिक अत्याचार केल्याचा तपासादरम्यान उघड झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल करून आरोपी दांपत्याला अटक केली आहे. पुढील तपास सुरू असून, या गंभीर गुन्ह्याला जबाबदारांना कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी होत आहे.

वाढदिवस साजरा करण्यासाठी मित्राच्या घरी घेऊन गेला अन् केला सामूहिक बलात्कार…

धक्कादायक! युवकाने होणाऱ्या पत्नीवर केला जबरदस्तीने बलात्कार अन् खून…

चिमुकल्याचा मृत्यू; नवऱ्याचा शरीर संबंधासाठी दबाव अन् सामूहिक बलात्कार…

ऑफिस पार्टीत युवतीने केले मद्यसेवन अन् सहकाऱ्याने केला बलात्कार…

The post नगरमध्ये 4 सख्ख्या बहि‍णींवर नातलगाने केला लैंगिक अत्याचार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka