Dailyhunt
नाशिक हादरलं! व्यावसायिकाने चिमुकल्यासह घेतली रेल्वेखाली उडी.

नाशिक हादरलं! व्यावसायिकाने चिमुकल्यासह घेतली रेल्वेखाली उडी.

नाशिक: येवला तालुक्यामध्ये एका व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत रेल्वेखाली उडी घेत जीवन संपवले आहे. चांदवड पोलिस स्थानकामध्ये आकस्मात मृत्यूचा गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

येवला तालुक्यातील धुळगावतल्या वाल्मीक गायकवाड (वय ४०) नावाच्या व्यावसायिकाने आपल्या चार वर्षांच्या मुलासोबत रेल्वेखाली येऊन आत्महत्या केली आहे. व्यावसायिकाने नेमक्या कोणत्या कारणास्तव आत्महत्या केली आहे, याचे कारण समजलेले. वाल्मीक आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा कारने चांदवड तालुक्यातील समिट तळेगाव येथे शनिवारी (ता. 28) संध्याकळच्यावेळी आले होते. तळेगाव रोही इथे कार पार्क करून वाल्मीक आणि त्यांच्या चार वर्षांच्या मुलाने पुढे जाऊन आत्महत्या केली. वाल्मीक गायकवाड यांच्या मागे वडील, पत्नी आणि दीड महिन्यांचा मुलगा असा परिवार आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, पोलिसांना घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. चांदवड पोलिसांकडून चांदवड पोलिस ठाण्यामध्ये आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिवाय, आकस्मात मृत्यूचा गुन्हाही दाखल करण्यात आला आहे.

नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

नाशिक! 400 कोटी रुपयांच्या कंटेनर चोरी प्रकरणात सर्वात मोठा ट्विस्ट…

नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…

नाशिकमध्ये हिट अँड रनचा थरार, बड्या बापाच्या मुलानं दोघांना उडवलं…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka