Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या.

नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या.

नाशिक : प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी आत्महत्या केल्यामुळे नाशिकच्या वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे जिल्हा शासकीय रुग्णालयातील वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ आहेत.

डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात कुटुंबासह राहत होत्या. शहरातील शांत आणि उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या गंगापूर रोड परिसरातील त्यांच्या राहत्या घरात त्यांनी नायलॉन दोरीच्या सहाय्याने आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच परिसरात मोठी खळबळ उडाली. डॉ. मनीषा जेजुरकर या शहरात एक कुशल आणि अनुभवी आयुर्वेदिक तज्ज्ञ म्हणून ओळखल्या जात होत्या. आयुर्वेदिक उपचार आणि समुपदेशनाच्या माध्यमातून त्यांनी अनेक रुग्णांना उपचार देत आरोग्याचा मार्ग दाखवला होता. त्यांच्या उपचारपद्धतीमुळे अनेक रुग्णांना दिलासा मिळाला होता. त्यामुळे रुग्णांमध्येही त्या लोकप्रिय होत्या. अशा एका अनुभवी आणि यशस्वी महिला डॉक्टरने अचानक आयुष्य संपवल्याने अनेकांना धक्का बसला आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

डॉ. मनीषा जेजुरकर यांचे पती डॉ. नीलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा शासकीय रुग्णालयात वरिष्ठ मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. मानसिक तणाव, नैराश्य आणि इतर मानसिक आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांना ते मार्गदर्शन करून उपचार देत असतात. मात्र मानसिक आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या डॉक्टरांच्या घरातच अशी दुर्दैवी घटना घडली आहे.

दरम्यान, या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच गंगापूर रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी पंचनामा करत पुढील तपास सुरू केला. मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. या ठिकाणी कोणतीही सुसाईड नोट आढळली आहे की नाही, याबाबत पोलिसांकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. गंगापूर रोड पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka