Dailyhunt
नाशिक शहर आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

नाशिक शहर आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या.

नाशिकः नाशिक शहर पोलिस आयुक्तालयातील पोलिस निरीक्षक, सहायक व उपनिरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. नाशिक शहर पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशान्वये सदरील बदल्या करण्यात आल्या आहेत.

वाहतूक शाखेतून अभियोग कक्षात दोन आठवड्यांपूर्वीच बदली झालेले पोलिस निरीक्षक दिनकर कदम यांची शहर वाहतूक शाखेच्या युनिट दोनमध्ये बदली करण्यात आली आहे. आगामी गणेशोत्सव व सणउत्सवाच्या पार्श्वभूमीवर युनिट दोनमध्ये वाहतूकीची समस्या उद्‌भवत असते. यामुळे आता दोन अधिकारी या युनिटमध्ये कार्यरत राहिल्यास वाहतुकीचे नियोजन सुलभ होण्याची शक्यता आहे.

संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!

उपनगरचे सहायक निरीक्षक सचिन चौधरी यांची अंमली पदार्थविरोधी पथकात बदली
सहायक निरीक्षक विश्वास चव्हाणके यांची मध्यवर्ती गुन्हेशाखेत,
महिला सहायक निरीक्षक सरला पाटील यांची तक्रार निवारण कक्षात,
सहायक निरीक्षक क्षितीजा ठुबे यांची नियंत्रण कक्षात,
उपनिरीक्षक पुंडलिक पावशे यांची दंगल नियंत्रण पथकात करण्यात आली आहे

उपनिरीक्षकांच्या बदल्या पुढीलप्रमाणेः
१) उपनिरीक्षक ज्ञानेश्वर भडांगे यांची सातपूर,
२) महिला उपनिरीक्षक नविता घुगे यांची गुन्हेशाखेत,
३) मोनालिया मोरे यांची महिला सुरक्षा विभागात,
४) उपनिरीक्षक भूषण सोनार यांची इंदिरानगर,
५) विशाल पाटील यांची अंमली पदार्थविरोधी पथकात,
६) समाधान हिरे यांची गुन्हेशाखा युनिट दोन,
७) दिलीप भंडे यांची उपनगर,
८) ज्ञानदेव राणे यांची बीडीडीएस शाखेत बदली करण्यात आली आहे.

पोलिस अधिकारी, कर्मचारी म्हणून धडाकेबाज कामगिरी केली असेल तर…

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली…

'सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? उच्च न्यायालयाने पोलिसांना खडेबोल…

खासगी वाहनांवर 'पोलिस', 'महाराष्ट्र शासन' लिहाल तर कारवाई…

Video: 'खैके पान बनारस वाला' या गीतावर नाचणारे पोलिस कर्मचारी निलंबीत…

The post नाशिक शहर आयुक्तालयातील पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka