Dailyhunt
वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली.

वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा घरी सुद्धा रुबाब?; कर्मचारी मानसिक तणावाखाली.

संतोष धायबर : पोलिसकाकापुणेः पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांच्या बदल्यांचे वृत्त 'पोलिसकाका'ने प्रसिद्ध केल्यानंतर पोलिस दलात एकच खळबळ उडाली. शिवाय, अनेकांनी 'पोलिसकाका'सोबत संपर्क साधून होणाऱ्या अन्यायाबाबत व्यथा मांडली आहे.

यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिस दलामध्ये नेमके चाललेय काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे.

‘पोलिसकाका’ने ‘पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून चर्चांना उधाण…’ अशा शीर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते. पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून नाराजी पुढे आली आहे. पण, संबंधित वृत्त प्रसारित झाल्यानंतर अनेक जण आपली व्यथा मांडण्यासाठी पुढे आले आहेत. पोलिस आयुक्तालयांमधील अंमलदारांमध्ये नाराजीचे वातावरण तयार झाले आहे.

पोलिस आयुक्तालया अंतर्गत बदलांच्या कारणावरून चर्चांना उधाण…

‘पोलिस अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी व स्वतःची खाजगी नको-नको ती कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांचा वापर केला जात आहे. पोलिस खात्यात असा कुठलाही नियम जीआर किंवा आदेश उपलब्ध नाही. सरकारी कर्मचाऱ्यांचा खाजगी कामासाठी वापर करणारे अधिकारी मनमानी करत आहेत. अंगावर खाकी वर्दी असतानाही तोंड दाबून बुक्क्यांचा मार सहन करावा लागत आहे. पोलिस कर्मचारीच जर मानसिक तणावाखाली काम करत असतील तर सर्वसामान्य नागरिकांना काय न्याय मिळणार? असा प्रश्न उपस्थित होत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मनमानी कारभाराबाबत पोलिस दलामध्ये दबक्या आवाजात चर्चा सुरू आहे,’ अशी माहिती नाव प्रसिद्ध न करण्याच्या अटीवर दिली आहे.

दरम्यान, राज्यातील पोलिस दलामध्ये कर्मचाऱ्यांची संख्या कमी आहे. तर दुसरीकडे पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांची घरी राबवावे लागत असल्याची चर्चा पोलिस दलात आहे. कनिष्ठ अधिकाऱ्यांना राबविणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावे ‘पोलिसकाका’कडे आली आहेत.

पोलिसकाका ही वेबसाईट राज्यातील पोलिसांसाठी काम करत आहे. पोलिसांनी केलेल्या उत्कृष्ठ कामाची दखल घेऊन वृत्त प्रसारीत करत आहे. दुसरीकडे कोणावर अन्याय होत असेल तर policekaka100@gmail.com अथवा 92721 94933 या व्हॉट्सक्रमांकावर संपर्क साधावा. आपले नाव प्रसिद्ध केले जाणार नाही.
– संपादक, पोलिसकाका

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka