Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिक शहरातील रुग्णालयात खळबळ, स्टाफ रुममध्ये नर्सचा मृतदेह.

नाशिक शहरातील रुग्णालयात खळबळ, स्टाफ रुममध्ये नर्सचा मृतदेह.

नाशिक : नाशिक शहरातील एका प्रसिद्ध खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या नर्सने रुग्णालयाच्या स्टाफ रुममध्ये गळफास घेतल्याची धक्कादायक घटना शनिवारी दुपारी उघडकीस आली आहे. या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

तन्वी भदाणे (वय २२, मूळ रा. कळवण) असे मृत नर्सचे नाव आहे. तन्वी गेल्या दीड वर्षांपासून नाशिकमधील जयराम रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यरत होती. ती रुग्णालयाने दिलेल्या क्वार्टरमध्ये राहत होती. शनिवारी सकाळची ती आपल्या रूमवर होती. दुपारी तिची सहकारी परिचारिका काही कामानिमित्त रूमवर आली असता, तिला रूमचा दरवाजा आतून बंद असल्याचे दिसले.

 Buy Maharashtrache Dada Book
Discount Price : 150 + Postage Charges
WhatsApp : 93712 69949 .

पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

सहकारी परिचारिकेने वारंवार आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने संशय बळावला. अखेर दरवाजा उघडून पाहिले असता, तन्वीने रूममधील पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. धक्कादायक प्रकार पाहून सहकारी परिचारिकेने तत्काळ रुग्णालय प्रशासनाला आणि पोलिसांना याची माहिती दिली.

दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तन्वीच्या मृत्यूबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. घटनास्थळी कोणतीही ‘सुसाईड नोट’ सापडली नसल्याचे समजते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka