नाशिक : नाशिकच्या इंदिरानगर परिसरात पीजीमध्ये राहणारी तरुणी वैष्णवी आवारे हिचा खून झाल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली असून, पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.
वैष्णवी हिचं लग्न दुसऱ्यासोबत ठरल्यानं प्रियकराने हत्या केल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे. तक्रारीनुसार, आरोपी आणि मयत वैष्णवी हिची इन्स्टाग्रामवर ओळख झाली होती. वैष्णवी हिच्या मैत्रिणीने तक्रारदार यांच्या बहिणीला, 'वैष्णवी ही चांगली मुलगी असून, तिला आई वडील नाहीत. गावी आजी आजोबा आहेत. ती तक्रारदार यांच्यासोबत चांगला संसार करू शकते', असे सांगितले.
वैष्णवी आणि तक्रारदार यांच्या लग्नाची बोलणी सुरू होती. त्यावेळी वैष्णवी हिने 'आपले याआधी साहिल लावारे (रा.उमरखेड, जि.यवतमाळ) याच्यासोबत अफेअर होते. ते दोघेही लिव्ह इनमध्ये राहत', असे सांगितले. त्यानंतर तक्रारदार यांचा वैष्णवी हिच्यावर आणखी विश्वास दृढ झाला आणि त्यांच्या दोघांनी लग्न करण्याचं ठरविले. मात्र त्यानंतर ही बाब साहिल याला समजली आणि साहिल याच्याकडून वैष्णवी हिला फोन करून त्रास देण्यास सुरुवात झाली. ही बाब देखील वैष्णवी हिने तक्रारदार यांना कळवली होती.
साहिल याने शुक्रवारी (ता. १७) 9 वाजता तक्रारदार यांना फोन करून, 'वैष्णवी हिला समजावून सांग, आणि माझ्याकडे पाठवून दे', असे म्हटले होते. त्यांनंतर तक्रारदार यांनी वैष्णवी हिला त्रास न देण्यास सांगितले. मात्र, साहिल याने वैष्णवी हिला त्रास देणं सुरूच ठेवले. वैष्णवी हिने तक्रारदार यांना फोन केला आणि 'साहिल येथे आला आहे', असे सांगितले. याचवेळी साहिल आणि वैष्णवीचा फोन सुरु होता. तब्बल 22 मिनिटे हा फोन सुरूच होता. संपूर्ण घडत असलेली घटना ही तक्रारदार फोनवर ऐकत होते. यावेळी सुरू असलेल्या फोनवर साहिल आणि वैष्णवी हिचे जोरदार भांडण सुरू होते. अखेर 'वैशुला आज संपवले', असा आवाज आला आणि फोन कट झाला' असल्याचे तक्रारदार यांनी सांगितले. त्यांनंतर तक्रारदार वैष्णवी राहत असलेल्या इंदिरानगर येथील वनसंपदा कॉलनी येथे पोहोचले असता वैष्णवी ही रक्ताच्या थारोळ्यात पडलेली होती आणि आजूबाजूला मोठी गर्दी देखील झाली होती, असे तक्रारदार यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.
नाशिकमध्ये युवतीची भररस्त्यात सपासप वार करत हत्या…
सैराट! नाशिकमध्ये प्रेयसीचा भाऊ अन् मेव्हण्याकडून अत्यंत निर्घृणपणे हत्या…
नाशिक! प्रसिद्ध डॉ. मनिषा जेजुरकर आत्महत्या प्रकरणात मोठा ट्विस्ट…
नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…
नाशिक हादरलं! चारित्र्याच्या संशयावरून पत्नीची निर्घुण हत्या…

