Dailyhunt
नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप.

नाशिकच्या डॉ. मनीषा जेजुरकर मृत्यूप्रकरणी माहेरच्यांकडून गंभीर आरोप.

नाशिक: प्रसिद्ध आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांनी शुक्रवारी (ता. 6) सकाळी राहत्या घरात गळफास घेत आयुष्य संपवल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस करत असतानाच आता या प्रकरणात नवा आणि गंभीर आरोप समोर आला आहे.

डॉ. मनीषा जेजुरकर यांच्या कुटुंबियांनी त्यांच्या पतीवर गंभीर आरोप केले आहेत. मनीषा जेजुरकर यांच्या मृत्यूमागे त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर यांचा छळ कारणीभूत असल्याचा दावा कुटुंबियांनी केला आहे. मनीषा जेजुरकर यांच्या भावाने केलेल्या आरोपांनुसार, डॉ. निलेश जेजुरकर यांचे विवाहबाह्य संबंध होते. या कारणामुळे गेल्या काही काळापासून मनीषा जेजुरकर यांना मानसिक त्रास दिला जात होता. नाशिकच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत असलेल्या निलेश जेजुरकर यांच्या वागणुकीमुळे त्यांच्या बहिणीला दीड वर्षांपासून मानसिक छळ सहन करावा लागला आहे. या सर्व प्रकारामुळे मनीषा जेजुरकर मानसिकदृष्ट्या खचल्या होत्या आणि त्यातूनच त्यांनी टोकाचे पाऊल उचलले असावे, असा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे.

 पोलिसांच्या उत्कृष्ट तपासाची कहाणी लवकरच पुस्तकातून वाचकांसमोर!

दरम्यान, या प्रकरणी मनीषा जेजुरकर यांच्या नातेवाईकांनी गंगापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तसेच डॉ. निलेश दत्तात्रय जेजुरकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही कुटुंबीयांनी केली आहे. पोलिसांनी तक्रारीची नोंद घेतली असून या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

डॉ. मनीषा जेजुरकर या नाशिकमध्ये आयुर्वेदिक सल्लागार म्हणून प्रसिद्ध होत्या. आयुर्वेदिक उपचार, समुपदेशन आणि पर्यायी उपचारपद्धतींच्या माध्यमातून त्या अनेक रुग्णांना आरोग्य सेवा देत होत्या. त्यांचे पती डॉ. निलेश जेजुरकर हे नाशिक जिल्हा सामान्य रुग्णालयात मनोविकारतज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. रुग्णसेवेत सक्रिय असलेल्या आणि समाजात चांगली ओळख असलेल्या डॉ. मनीषा जेजुरकर यांनी असे टोकाचे पाऊल उचलल्याने नाशिकमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.

नाशिक! प्रख्यात आयुर्वेदिक तज्ज्ञ डॉ. मनीषा जेजुरकर यांची आत्महत्या…

पुणे! नामांकित डॉक्टरने घेतला गळफास; सुसाईड नोटमध्ये लिहिलं…

नाशिक हादरलं! व्यावसायिकाने चिमुकल्यासह घेतली रेल्वेखाली उडी…

नाशिक जिल्ह्यातील युवतीच्या खुनाचा गुन्हा काही तासांतच उघड; प्रेमसंबंधातून हत्या…

नाशिक पोलिस दलातील बडतर्फ पोलिसाचा लॉजवर संशयास्पद मृत्यू…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka