Dailyhunt
नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण.

नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण.

नाशिक : नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात प्रसुती झालेल्या महिलेच्या पाच दिवसाच्या बाळाची चोरी झाल्यानंतर खळबळ उडाली होती. पण, नाशिक पोलिसांनी तपासाचे चक्र फिरवत बाळ चोरी करणाऱ्या महिलेला ताब्यात घेऊन बाळाला सुखरूप आईच्या स्वाधीन केले आहे.

पोलिसांवर अभिनंदनाचा वर्षाव केला जात आहे. पण, पोलिसांनी केलेल्या या प्रकरणाच्या तपासात धक्कादायक कारण समोर आले आहे.

नाशिकच्या जिल्हा शासकीय रुग्णालयात सुमन खान (रा. सटाणा) या महिलेचे सिजर करून प्रसुती झाली होती. महिलेला पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयातच दाखल करण्यात आले होते. या दरम्यानच एमबीए असलेल्या सपना मराठे या महिलेने सुमन खान यांच्याशी ओळख करून खान यांचा विश्वास संपादन केला त्यांना रुग्णालयातच नातेवाईक कामाला असल्याचे सांगितले.

डिस्चार्जच्या दिवशी महिलेचा पती रिपोर्ट आणण्यासाठी गेला असताना सपना मराठे प्रसुती झालेल्या महिलेकडे आली. तुम्ही मागून या, तुमचे टाके दुखतील मी, तुमच्या बाळाला घेऊन जाते, असे सपना हिने सांगितले. त्यानंतर सपना रुग्णालयातून बाळाला घेऊन पसार झाली होती. रुग्णालयातून बाहेर आल्यानंतर सुमनला बाळ आणि महिला गायब झाल्याचे समजल्यानंतर धक्का बसला होता. यानंतर महिलेने आणि तिच्या पतीने रुग्णालय प्रशासनाकडे बाळ चोरीला गेल्याची तक्रार केली. बाळाला घेऊन जात असताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले होते. बाळ हरवल्याची फिर्याद अब्दुल खान यांनी सरकारवाडा पोलिस ठाण्यात दिली.

बाळ चोरी गेल्यानंतर नाशिक शहर पोलिसांचे विविध पथके या महिलेच्या मागावर होते. जिल्हाभरात पोलिसांचे पथक महिलेच्या तपासासाठी असतानाच पंचवटी येथील एका खाजगी रुग्णालयात एक महिला लहान बाळाला घेऊन आल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर तात्काळ पोलिसांनी या महिलेची माहिती घेतली आणि बाळ चोरलेली महिला हीच असल्याचे समोर आले. नाशिक गुन्हे शोध पथकाने अवघ्या 12 तासात बाळ शोधून आईकडे सोपवले.

सपना मराठे ही उच्चशिक्षित महिला धुळे जिल्ह्यातील आहे. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीतून पोलिसांनी सपना मराठेला ताब्यात घेतलं. महिलेला पोलिसांनी ताब्यात घेत सखोल चौकशी केली असता बाळ चोरी का केली? हे सांगताना महिलेने सांगितलेली हकीगत बघून पोलिस देखील काही काळ चक्रावले. बाळ होत नसल्याने ही महिला नाशिक जिल्हा रुग्णात आली आणि नवजात बाळ चोरी करण्याचे ठरवले आणि बाळ चोरले.

सपना मराठे ही महिला उच्चशिक्षित असल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. या महिलेचा दोन वेळा गर्भपात झाला असून, या महिलेला बाळ होत नसल्याने बाळ चोरी केल्याचे पोलिसांना तपासादरम्यान सांगितले. सपना मराठे आणि तिचा पती हे दोघे धुळे येथे वास्तव्यास आहेत. एमबीएचे शिक्षण झालेल्या महिलेने लेखापाल पदाची परीक्षा देखील उत्तीर्ण केल्याचे पोलिसांनी सांगितले. गेल्या 9 महिन्यांपासून महिलेने इतर नातेवाईकांना न भेटता गर्भवती असल्याचे सांगितले आणि बाळ चोरी करून ही महिला तिच्या घरी गेली. महिलेच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनंतर सपना मराठे ही खोटं बोलत असल्याचे समोर आले आणि अडकली.

नाशिक जिल्हा रुग्णालयातून पाच दिवसांचे बाळ महिलेने पळवले…

लहान मुलांच्या चोरीचे रॅकेट उद्ध्वस्त; आठ नवजात बाळांची सुटका…

हृदयद्रावक घटनेने पुणे हादरले! नवजात बालकाच्या तोंडावर चक्क प्लास्टिकची पिशवी बांधली अन्…

निर्दयी! पुणे शहरात कचऱ्यात आढळले नवजात अर्भक…

बारामती हादरली! स्वच्छतागृहात आढळलं स्त्री जातीचं मृत अर्भक…

सार्वजनिक शौचालयातील कचऱ्यात आढळले अर्भक…

The post नाशिकच्या रुग्णालयातून एमबीए महिलेने चोरलं बाळ; कारण… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka