Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
नाशिकमध्ये 1200 जणांचा मोठा स्कॅम; शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक.

नाशिकमध्ये 1200 जणांचा मोठा स्कॅम; शिक्षणाधिकाऱ्याला धुळ्यातून अटक.

नाशिक : संपूर्ण राज्यभरात खळबळ उडवून देणाऱ्या १६० कोटींपेक्षा अधिक रक्कमेच्या बनावट 'शालार्थ आयडी' आणि शासन फसवणूक प्रकरणात विशेष तपास पथकाने (SIT) अतिशय मोठी कारवाई केली आहे.

याप्रकरणी जळगाव जिल्हा परिषदेचे तत्कालीन माध्यमिक शिक्षणाधिकारी शशिकांत भाऊराव हिंगोणेकर (वय ६६, रा. जळगाव) याला धुळे येथून अटक केली आहे. अटकेनंतर संशयिताला न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला २७ तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

'एसआयटी'च्या सखोल तपासादरम्यान संशयित शशिकांत हिंगोणेकर याच्या कारभाराविषयी अतिशय धक्कादायक माहिती समोर आली आहे. हिंगोणेकर याने २०२२ ते २०२५ या कालावधीत जळगाव येथील माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात कार्यरत असताना, वैयक्तिक मान्यतेचा कोणताही अधिकृत प्रस्ताव प्राप्त झालेला नसतानाही २५९ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना बनावट वैयक्तिक मान्यता प्रदान केली. शिवाय, बनावट 'शालार्थ प्रणाली'त या बेकायदेशीर नोंदी करून शासनाकडून कोट्यवधी रुपयांचे वेतन आणि थकबाकीची रक्कम लाटण्यात आली. या संपूर्ण रॅकेटची सध्या एसआयटीकडून अत्यंत बारकाईने चौकशी सुरू आहे.

नाशिक विभागातील नाशिक, जळगाव, धुळे आणि नंदुरबार या चार जिल्ह्यांमध्ये एकूण ८४२ शिक्षक व कर्मचाऱ्यांचे कोणतेही वैध प्रस्ताव अस्तित्वात नसताना, केवळ कागदपत्रांवर मागील तारखेच्या नियुक्त्या दाखवण्यात आल्या. या माध्यमातून शासनाची तब्बल १६० कोटी रुपयांपेक्षा जास्त आर्थिक फसवणूक करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे. या महाघोटाळ्याप्रकरणी नाशिकरोड पोलिस ठाण्यात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, यामध्ये अनेक संस्थाचालक, मुख्याध्यापक, तत्कालीन शिक्षणाधिकारी आणि वेतन अधीक्षकांचा थेट सहभाग असल्याचे उघड झाले आहे.

दरम्यान, या महाघोटाळ्यात आतापर्यंत सुमारे १२०० संशयितांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे. माजी शिक्षणाधिकाऱ्याच्या अटकेमुळे शिक्षण क्षेत्रात एकच खळबळ उडाली असून, या प्रकरणात येत्या काही दिवसांत आणखी बड्या अधिकाऱ्यांवर आणि संस्थाचालकांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.

दिल्लीत महिलेवर हात उचलणाऱ्या DCP संदीप लांबा यांच्यावर सरकारकडून कारवाई…

पुणे शहरात ८० वर्षीय महिलेच्या खासगी मालमत्तेत अनधिकृत प्रवेशाचा आरोप…

दिल्ली पोलिसांकडून महिला कार्यकर्त्यांशी असभ्य वर्तन; Video Viral…

महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka