Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया.

महाराष्ट्राचे सुपूत्र IPS विनायक भोसले यांच्या उत्तर प्रदेशात धडाकेबाज कारवाया.

मेरठ (उत्तर प्रदेश): मेरठ येथे स्वाट टीम (नगर) आणि लिसाडी गेट पोलिसांनी संयुक्त कारवाई करत अवैध शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी सहा आरोपींना अटक केली असून, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात अवैध शस्त्रे, अर्धवट तयार पिस्तुले, शस्त्रनिर्मितीसाठी वापरली जाणारी उपकरणे आणि गुन्ह्यात वापरलेली कार जप्त केली आहे, अशी माहिती IPS आणि एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेरठचे एसपी सिटी विनायक गोपाल भोसले यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात अवैध शस्त्रांची विक्री व निर्मिती रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत पोलिस अधीक्षक (नगर) यांच्या मार्गदर्शनाखाली आणि क्षेत्राधिकारी कोतवाली यांच्या देखरेखीखाली स्वाट टीम (नगर) आणि लिसाडी गेट पोलिसांनी ही कारवाई केली.

पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे १९ जुलै २०२६ रोजी हाजी राशिद कॉलनी, मदीना फेस-२, लिसाडी गेट परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी मोहम्मद शाजिद ऊर्फ लीलू, रिजवान, राशिद, साजिद, कोमल कुमार आणि सजाउद्दीन या सहा आरोपींना अटक करण्यात आली. पोलिसांनी आरोपींच्या ताब्यातून तीन तयार पिस्तुले आणि ४४ अर्धवट तयार पिस्तुले जप्त केली. याशिवाय पिस्तुलांचे भाग, स्प्रिंग, मॅगझिनचे भाग, हॅमर, डाई, ड्रिल मशीन, ग्राइंडर मशीन, रेती, प्लास, पेचकस, शिंकजे, ब्लेड, लॉक, स्क्रू आणि अन्य शस्त्रनिर्मितीचे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त करण्यात आले.

आरोपी कोमल कुमार, रिजवान आणि राशिद यांच्या चौकशीतून गुन्ह्यात वापरलेली पांढऱ्या रंगाची ओरा कार (क्रमांक UP81DW2604) पोलिसांनी जप्त केली. तसेच आरोपी सजाउद्दीन याच्या समर कॉलनीतील घरातून, फातिमा मशिदीजवळ, अवैध शस्त्रनिर्मितीसाठी वापरले जाणारे उपकरणे व साहित्य जप्त करण्यात आले.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये मोहम्मद शाजिद ऊर्फ लीलू (वय ४२), रिजवान (वय ४८), राशिद (वय ४९), साजिद (वय ३२), कोमल कुमार (वय ३६) आणि सजाउद्दीन (वय ५०) यांचा समावेश आहे. आरोपींविरुद्ध लिसाडी गेट पोलिस ठाण्यात नियमानुसार कायदेशीर कारवाई सुरू आहे. आरोपींपैकी एका आरोपीविरुद्ध अलीगढ येथील देहली गेट पोलिस ठाण्यात यापूर्वी गुन्हा दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

संबंधित कारवाई विनायक भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली लिसाडी गेट पोलिस ठाण्याचे प्रभारी दलवीर सिंह, स्वाट टीमचे उपनिरीक्षक मनीष कुमार शर्मा आणि पोलिस पथकाने केली. या कारवाईत उपनिरीक्षक महेश शर्मा, कोशिंद्र कुमार, अंबुज सिंह जादौन, संदीप, प्रशांत, अभिषेक नागर, विनय तसेच हेड कॉन्स्टेबल मोहित शर्मा आणि कॉन्स्टेबल अंकुश व नीरज कुमार सहभागी होते. पोलिस पुढील तपास करत आहेत.

IPS विनायक भोसले यांनी शस्त्रनिर्मिती करणाऱ्या कारखान्याचा केला पर्दाफाश…

IPS विनायक भोसले यांनी बनावट कर्ज टोळीचा केला पर्दाफाश…

IPS विनायक भोसले यांची संवेदनशीलता ठरली निर्णायक; कामगिरीचे सर्वत्र होतेय कौतुक…

जिद्दीच्या जोरावर बनला IPS; गावकऱ्यांनी काढली चक्क हत्तीवरून मिरवणूक…

महाराष्ट्रातील मजुराचा मुलगा UPSC परीक्षेत उतीर्ण; IPS पदाला गवसणी…

Video! पोलिस अधिकारी IPS अमिताभ गुप्ता यांची विशेष मुलाखत…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka