Dailyhunt
नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या.

नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या.

नाशिक: नाशिक शहरात बुधवारी (ता.19) रात्री झालेल्या दुहेरी हत्याकांडामुळे नाशिक हादरले आहे. उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील आंबेडकरवाडी येथे दोघा सख्ख्या भावांचा टोकळ्यांकडून धारदार शस्त्राने भोसकून हत्या करण्यात आल्याने शहरात एकच खळबळ उडाली आहे.

पूर्ववैमनस्यातून खून झाल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला असून या प्रकरणी पाच संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव: प्राध्यापक ते पोलिस अधिकारी!

उमेश जाधव आणि प्रशांत जाधव असे हत्या झालेल्या दोन भावांची नावे आहेत. अजित पवार गटाच्या एका पदाधिकाऱ्यासह त्यांच्या भावावर टोळक्याने कोयत्याने सपासप वार केले आहेत. यात दोन्ही भावांचा जागीच रक्ताच्या थारोळ्यात पडून मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांनी मृतांच्या हातावर, डोक्यावर, पाठीवर, पोटावर आणि चेहऱ्यावर धारदार कोयत्याने वार केले आहेत. दुहेरी हत्येची ही घटना उघडकीस येताच नाशिक शहरात एक खळबळ उडाली आहे.

उमेश जाधव आणि प्रशांत जाधव हे दोघे बुधवारी रात्री साडे अकरा वाजता उपनगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील पुणे-नाशिक महामार्गालगत असणाऱ्या आंबेडकरवाडीतील एका सार्वजानिक शौचालयासमोरून जात होते. यावेळी शौचालयाजवळ दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी दोन्ही भावांवर अचानक हल्ला केला. अचानक हल्ला केल्याने दोन्ही भावांना स्वत:चा बचाव करता आला नाही. हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने दोघांवर अनेक वार केले. दोघेही भर रस्त्यात रक्ताच्या थारोळ्यात पडले. दोघांवर हल्ला झाल्याची माहिती परिसरातील काही युवकांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित युवकांनी दोन्ही भावांना तातडीने शासकीय जिल्हा रुग्णालयात दाखल केले. पण तोपर्यंत खूप उशीर झाला होता. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दोघांनाही मृत घोषित केले. मध्यरात्री दोन सख्ख्या भावांवर अशाप्रकारे हल्ला झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

मृत उमेश जाधव हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर उपाध्यक्ष म्हणून काम करत होते. राजकीय कनेक्शन असलेल्या एका पदाधिकाऱ्यासह भावाची एकाच रात्री हत्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन्ही भावांवर नेमका हल्ला कुणी केला आणि कशासाठी केला? याची माहिती अद्याप समोर आली नाही. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. आरोपींच्या शोधासाठी चार पथकं रवाना केले आहेत. नाशिक शहरात घडलेल्या या दुहेरी हत्याकांडाने पुन्हा कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न चव्हाट्यावर आला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलिस करत आहेत.

प्रेमसंबंध! नाशिकमध्ये महिलेची प्रियकरासह रेल्वेखाली उडी; चिठ्ठीतील नावे पाहा…

नाशिकमध्ये मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आल्याने उडाली खळबळ…

नाशिकमध्ये गुन्हेगारीचा कहर! पोलिस अधिकाऱ्यावरच जीवघेणा हल्ला…

नाशिकमध्ये कोयता गँगचा दिवसा ढवळ्या सिनेस्टाईल धुमाकूळ…

नाशिकमध्ये सपासप 13 वार करुन युवकाची भर रस्त्यात हत्या…

The post नाशिकमध्ये दोन सख्ख्या भावांची कोयत्याचे सपासप वार करून हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka