Dailyhunt
नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS.

नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS.

नाशिक : नाशिकमध्ये तोतया आयपीएस (IPS) अधिकारी बनून एका व्यावसायकाची 1 कोटीहून अधिक रकमेची फसवणूक करण्यात आल्याची घटना अंबड पोलिस स्टेशन हद्दीत घडली आहे. आरोपीने बनावट ओळखपत्रे दाखवून रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून ही फसवणूक केल्याचे समोर आले आहे.

आरोपीने पीडित व्यावसायिकांना रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून खंडणीची मागणी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अंबड पोलिसांनी अटक केली आहे.

विठ्ठल सखाराम वाकडे (वय 56, व्यवसाय ट्रान्स्पोर्ट, रा. श्रीजी बंगला क्र. 57, पाणिनी सोसायटीच्या मागे, वसंतनगर, राणेनगर, नाशिक) यांनी अंबड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, आरोपी गौरव अच्छेराम मिश्रा (वय 37, रा. मिश्रा हाऊस, महालक्ष्मीनगर, कामटवाडे, अंबड लिंक रोड, नाशिक) याने 2018 मध्ये त्यांच्याशी ओळख करून घेतली. आरोपी मिश्रा हा स्वतःला भारतीय पोलिस सेवेतील (आयपीएस) अधिकारी असल्याचे भासवत होता. तो नेहमी पोलिस गणवेश परिधान करून लाल-निळ्या दिव्यांची गाडीतून फिरत असे. आपल्याकडे शासनाने दिलेले सुरक्षा रक्षक असल्याचे दाखवून वाकडे यांचा विश्वास संपादन केला. मिश्रा याने वाकडे यांना रेल्वेचे बनावट टेंडर मिळवून देण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून वेळोवेळी पैसे उकळले.

वाकडे यांनी मिश्राला एकूण 1 कोटी 7 लाख 88 हजार 106 रुपये इतकी रक्कम दिली. यामध्ये रेल्वे डेपो येथे गाड्यांचा पुरवठा, सिक्युरिटी डिपॉझिट, गाड्यांचा खर्च अशा विविध कारणांसाठी पैसे देण्यात आले. मात्र, कालांतराने वाकडे यांना मिश्राच्या बनावटीची जाणीव झाली. त्यांनी मित्राकडे पैसे परत करण्याची मागणी केली असता तो त्यांना टाळाटाळ करू लागला. 13 ऑक्टोबर 2024 रोजी मिश्राने वाकडे यांना आगरा हॉटेल, पाथर्डी फाटा, नाशिक येथे भेटण्यासाठी बोलावले, तेथे 10-12 गुंडांना सोबत घेऊन आलेल्या मित्राने वाकडे यांना रिवॉल्व्हरचा धाक दाखवून धमकी दिली आणि पैसे विसरून जाण्यास सांगितले. शिवाय, दरमहा 5 लाख रुपये खंडणीची मागणी केली. त्यानंतर त्यांनी अंबड पोलिस ठाण्यात धाव घेत मिश्रा याच्याविरुद्ध तक्रार दाखल केली. पोलिसांनी मिश्रा याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तोतया आयपीएस अधिकाऱ्याला अंबड पोलिसांनी अटक केली असून, पुढील तपास करत आहेत.

दरम्यान, तोतया आयपीएस अधिकारी गौरव मिश्रा याचे काही सरकारी अधिकाऱ्यांसोबत चांगले संबंध असल्याने त्याने गैरफायदा घेतल्याची माहिती पुढे आली आहे. गौरव मिश्रा हा त्याच्या खासगी वाहनावर दिवा वापरत होता. त्याचप्रमाणे पोलिस अधिकाऱ्यांची ‘वर्दी’ वापरत होता तर गौरव मिश्रा हा तोतया अधिकारी बनून चक्क पीटीसी येथील दिक्षांत समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून गेल्याची माहिती समोर आली आहे.

अभिनेत्री प्रकरण! तीन IPS अधिकाऱ्यांचे निलंबन…

महिला ips अधिकाऱ्याचा पाठलाग करत राहिला अन् जाळ्यात सापडला…

गुजरातमध्ये पाच वर्षे सुरू होते बनावट न्यायालय; वकीलच बनला न्यायाधीश अन्…

Fake IPS झालेल्या मिथिलेश याच्या कहाणीत नवा ट्विस्ट…

The post नाशिकमध्ये लाल-निळ्या दिव्यांची गाडी अन् पोलिसांची वर्दी घालणारा तोतया IPS… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka