Dailyhunt
नवऱ्याच्या प्रेयसीला फोन करून बोलवलं अन् पुढे.

नवऱ्याच्या प्रेयसीला फोन करून बोलवलं अन् पुढे.

खनौ (उत्तर प्रदेश) : लखनौ-आग्रा एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस लेनमध्ये एक महिला आणि तिच्या छोट्या मुलीचा मृतदेह सापडला होता. मायलेकींची हत्या करून मृतदेह हसनगंज येथील सर्व्हिस लेनजवळ फेकण्यात आले होते.

पोलिसांनी तपास करून आरोपींना अटक केली आहे.

वीटभट्टी व्यावसायिकाच्या पत्नीने चालक, नोकर आणि अन्य दोन जणांच्या मदतीने नवऱ्याच्या प्रेयसीची आणि तिच्या मुलीची हत्या केली होती. मुलीने सत्य उघड करू नये म्हणून निष्पाप मुलीचीही हत्या करण्यात आली. पोलिसांनी हत्येची सूत्रधार असलेली महिला, वीटभट्टी मालक (प्रियकर) आणि अन्य दोन आरोपींना अटक केली आहे. मृत महिलेजवळ सापडलेल्या पर्सचा पोलिसांच्या खुलाशात महत्त्वाचा वाटा आहे.

हसनगंज कोतवाली भागातील लखनौ-आग्रा एक्सप्रेस वेच्या सर्व्हिस लेनवर ताला सराय गावाजवळ मंगळवारी सकाळी एका महिला आणि मुलीची हत्या करून मृतदेह फेकून दिल्याचे समोर आले होते. रोशनी (वय २५, रा. लखीमपूर खेरी कांशीराम कॉलनी) असे मृत महिलेचं नाव आहे. तिच्याकडून लखनौ रोड, हरदोई येथील सुनील कुमार ज्वेलर्स या दुकानाची पर्स आणि व्हिजिटिंग कार्ड सापडले. पोलिसांचे पथक दुकानात पोहोचले आणि तिची ओळख पटवली. त्यावर सराफ यांनी मोबाईल क्रमांक दिला होता. या क्रमांकाच्या मदतीने तिची ओळख पटली.

पोलिस तपासात समोर आले की, मृत महिला लग्नानंतर काही काळानंतर पतीपासून विभक्त झाली होती. महिलेचे तिचा पती मोनूसोबत अनैतिक संबंध होते. वारंवार समजावूनही त्यांनी ऐकले नाही. दोघांनीही 5 मे रोजी त्यांचा रिलेशनशिपचा वाढदिवस साजरा केला होता, हे मोनूची पत्नी ज्योतीला समजले होते. आपल्या पतीच्या प्रेयसीला मार्गातून काढण्यासाठी हत्येचा भयावह कट रचला. ६ मे रोजी रात्री उशिरा ज्योतीने तिच्या पतीच्या मोबाईलवरून रोशनीला फोन करून मोनूची तब्येत बिघडली असून त्याला रुग्णालयात दाखल केल्याचे सांगितले.

ज्योती रोशनीला म्हणाली, ‘आम्ही येतोय तुला घ्यायला. घरी पोहोचल्यानंतर ज्योतीने रोशनी आणि तिची 5 वर्षांची मुलगी दिव्याला गाडीत बसवलं. यावेळी ज्योतीसह तिचा चालक निरंकर, नोकर कल्लू, प्रिन्स आणि अन्य दोन साथीदारांनी हा खून केला. त्यानंतर रात्रीच्या अंधारात हसनगंज कोतवाली भागात लखनौ-आग्रा एक्स्प्रेस वेच्या सर्व्हिस लेनवर आई आणि मुलीचे मृतदेह कारमधून फेकण्यात आले. पोलिसांनी हत्येचा उलगडा केल्यानंतर, घटनेत वापरलेली कार, मुख्य आरोपी महिला, नोकर कल्लू आणि इतर तिघांना अटक केली आहे.’

प्रेयसीच्या गालावर गरम लोखंडी रॉडने लिहिलं स्वतःचं नाव…

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव…

प्रेयसीच्या साखरपुड्यानंतर नवऱ्याच्या घराच्या गेटला लावली बॉम्बसदृश वस्तू अन् पुढे…

नवरा प्रेयसीसोबत तर पत्नी प्रियकरासोबत गेली पळून; तीन चिमुकल्या रडत आहेत…

व्हॅलेंटाईन डेलाच प्रेयसीवरील संशयातून मित्राची हत्या…

प्रेयसीला जंगलात भेटायला बोलावलं अन् खेळ खल्लास केला…

The post नवऱ्याच्या प्रेयसीला फोन करून बोलवलं अन् पुढे… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka