Dailyhunt
प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव.

प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव.

पुणे : लष्करातील जवानाच्या प्रेमात पडली आणि प्रियकराच्या मदतीने पतीचा काटा काढला. पतीचा अपघात झाल्याचा बनाव रचत, एक कोटी रुपयांचा विमा हडपायचा कट ही रचण्यात आला. मात्र, पिंपरी चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकानं त्यांचे बिंग फोडलं.

पतीच्या हत्येप्रकरणी पत्नी आणि लष्करातील प्रियकर जवानासह साथीदाराला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. सुप्रिया गाडेकर असे पत्नीचे, सुरेश पाटोळे असे जवानाचे आणि रोहिदास सोनवणे असे साथीदाराचे नाव आहे. तर राहुल गाडेकर असे मृत व्यक्तीचे नाव आहे.

राहुल आणि सुप्रिया या दोघांचा सहा वर्षांपूर्वी विवाह झाला असून, त्यांना चार वर्षाचा मुलगा आहे. राहुल वाहन क्षेत्रातील नामांकित कंपनीत नोकरीवर होता. सुप्रिया आधी परिचारिका तर नंतर कोरोनाकाळात तिने लॅब सुरु केली. याच लॅबमध्ये तिची दिल्लीत सैन्य दलात नोकरीला असणाऱ्या सुरेश पाटोळे सोबत झाली. दोघांमध्ये संवाद वाढत गेला आणि दोघांचे विवाहबाह्य प्रेमसंबंध जुळले. सुरेशचे ही चार वर्षांपूर्वी लग्न झालेले असून त्यांना ही दोन वर्षांची मुलगी आहे. सुप्रियावर पती राहुलला संशय आला. यावरून दोघांमध्ये खटके उडू लागले. मग एकमेकांच्या प्रेमात वेडे झालेल्या सुप्रिया आणि सुरेशने कट रचला आणि प्रेमात अडसर ठरणाऱ्या राहुलचा काटा काढायचे ठरले. राहुलचा अडथळा दूर करताना त्याच्या नावे असणारा एक कोटींचा विमा हडपायचा, असा ही डाव त्यांनी आखला.

तीन महिन्यापूर्वी म्हणजे डिसेंबरमध्ये सुरेश दिल्लीवरून सुट्टीसाठी देहूत त्याच्या घरी आला. अहमदनगर जिल्ह्यातील आते-बहिणीच्या गावी जाऊन रोहिदासला याबाबत सांगितले आणि तुला तुझ्या वाटणीचे पैसे दिले जातील, असे सांगून त्याला ही या कटात सहभागी करून घेतले. दहा फेब्रुवारीला अहमदनगर जिल्ह्यातील अकोले गावातून पत्नीला भेटून, राहुल कामावर येत होता. याबाबत पत्नी सुप्रियाने पतीची खबर प्रियकर सुरेशला दिली. त्यावेळी पुणे-नाशिक महामार्गावर सुरेश आणि रोहिदासने पाठलाग सुरु केला. घारगाव जवळ या दोघांनी राहुलच्या गाडीवर हल्ला करत, त्यास जीवे मारण्याचा प्रयत्न केला, पण राहुल यातून बचावला. जखमी अवस्थेत राहुल नगर पोलिसांकडे गुन्हा दाखल केला.

राहुलने कंपनीला विनंती करून रात्रपाळी सुरु करून घेतली आणि नऱ्हे आंबेगावमध्ये राहण्याऐवजी आळंदी लगत राहणाऱ्या पत्नीच्या मामाच्या घरी राहायचे ठरवले. याबाबत पत्नीने प्रियकर सुरेशला याची कल्पना दिली. मग सुरेशने रोहिदासच्या सोबतीने रेकी करायला सुरुवात केली. 23 फेब्रुवारीला पती पत्नीच्या मामाच्या घरातून चाकण एमआयडीसीमधील कंपनीत कामासाठी निघाला. तो घरातून बाहेर पडताच पत्नीने सुरेशला कळवलं आणि त्या दोघांनी राहुलला रस्त्यात गाठले. गाडी आडवी मारून त्याला खाली पाडलं, मग पाठीवर उभं राहून, हातोडीनं डोक्यावर प्रहार केला. त्याचा मृत्यू झालाय हे पडताळून, ते दोघे तिथून पसार झाले. मग अपघात होऊन राहुलचा मृत्यू झाल्याचा बनाव केला. राहुलच्या नामे एक कोटी रुपयांचा असणारा विमा आपल्याला मिळावा हा त्यामागचा आणखी एक हेतू होता.

पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुंडा विरोधी पथकाने तांत्रिक तपास केला अन पत्नीसह प्रियकराचे बिंग फुटले. पत्नीला तर घरूनच बेड्या ठोकल्या, पण लष्करात कार्यरत असणारा सुरेश आधी दिल्ली अन तिथून सैन्य दलातील टप्प्याचं प्रशिक्षण घेण्यासाठी हैद्राबादला गेला होता. तिथे जाऊन सुरेशला आणि रोहिदासला त्याच्या गावातून अटक करण्यात आली आहे. तिघांना 19 मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

पोलिस अधिकाऱ्यासोबत महिला डॉक्टरचे प्रेमसंबंध अन् आत्महत्या…

महिला पोलिसाच्या मुलाने प्रेमप्रकरणातून घेतला जगाचा निरोप…

मामीसोबत होते भाच्याचे प्रेमसंबंध अन् पुढे…

पुण्यातील व्यावसायिकाची प्रेम प्रकरणातून गुवाहाटीत हत्या…

धक्कादायक! नवऱ्याच्या घराजवळच थाटला प्रेमविवाहानंतर दुसरा संसार अन् पुढे…

The post प्रेमात वेडे! प्रेयसीसह जवानाला बेड्या; नवऱ्याचा गेला जीव… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka