Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल.

पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल.

भोपाळ (मध्य प्रदेश) : इंदूरमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादानंतर स्वत:ला पेटवून घेतलेल्या सुनील लोहानी (वय 35) या व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पत्नीच्या पाचव्या लग्नावरुन आपल्या पत्नीशी वाद झाला आणि त्यामुळेच त्याने हे पाऊल उचलले, अशी माहिती पोलिसांनी दिली.

पोलिस अधिकारी शैलेंद्र सिंह जादोने यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘मृत सुनील लोहानी महिलेचा चौथा पती होता. महिलेने 2018 मध्ये सुनील लोहानी सोबत विवाह केला होता. लग्नाच्या काही दिवसांनंतर दोघांमध्ये भांडणे होऊ लागली होती. महिला यानंतर माहेरी राहात होती. महिलेनं मृत पतीविरोधात पोलिसांत तक्रारही दाखल केली होती. हुंड्यासाठी छळ केल्याचा गुन्हा महिलेने पोलिसांत दाखल केला होता. न्यायालयीन खटल्याला कंटाळून महिलेच्या पतीनं टोकाचे पाऊल उचलले असू शकतो, असा प्राथमिक अंदाज आहे. पण, लोहानी यांनी आत्महत्या करण्यापूर्वी स्वतःचा एक व्हिडीओ शूट केला होता आणि तो सुसाईड नोटसह सोशल मीडियावर शेअर केला होता, ज्यात त्याच्या पत्नीने पाचव्यांदा लग्न केल्यामुळे तो नाराज असल्याचं म्हटले होते.’

दरम्यान, महिलेने पाचवे लग्न केले असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पत्नीने पाचव्यांदा लग्नगाठ बांधल्यामुळे इंदूरमधील जुनी परिसरात लोहानी यांनी स्वतःवर पेट्रोल टाकून स्वतःला पेटवून घेतले होते. संबंधित घटना घरात बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस या प्रकरणाचा कसून तपास करत आहेत.

धक्कादायक! लग्नानंतर नवरीने पाचव्या दिवशीच दाखवला खरा चेहरा…

राजाबाबू! डॉक्टर तर कधी अधिकारी सांगून 6 महिलांशी केली लग्न अन्…

70 वर्षांच्या सासऱ्याने 28 वर्षांच्या सुनेसोबत केलं लग्न…

Video: दीरासोबत लग्न करण्यासाठी दोन वहिनींमध्ये जोरदार राडा…

दोघांना सोडलं, तिसऱ्याची हत्या अन् चौथं लग्न करायला निघाली…

The post पत्नी पाचव्यांदा लग्न करत समजल्यावर चौथ्या पतीने उचलले मोठे पाऊल… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka