Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पत्नीला जाळल्याचा संशयावरून पतीला अटक; पण प्रियकरासोबत सापडली 'जिवंत'.

पत्नीला जाळल्याचा संशयावरून पतीला अटक; पण प्रियकरासोबत सापडली 'जिवंत'.

सोलापूर: एका कडब्याच्या गंजीला आग लागली आणि त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी नवऱ्याला अटक झाली होती. पण, या घटनेला धक्कादायक वळण मिळाले आहे. पोलिसांना तपासादरम्यान ज्या महिलेचा मृत्यू झाला, ती जिवंत असून कराडमध्ये एका व्यक्तीसोबत सापडली आहे.

ही व्यक्ती तिचा प्रियकर असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

पंढरपुरातील दशरथ दांडगे यांची मुलगी किरण हिचे लग्न पाटकळच्या नागेश सावत यांच्याशी झाले होते. दोघांना आरोही नावाची दोन वर्षांची मुलगी आहे. किरणचे चुलत सासरे दत्तात्रेय सावंत यांनी 14 जुलै रोजी पहाटे 3:30 वाजता किरणच्या वडिलांना फोन केला आणि तुमची मुलगी किरणने स्वतःला पेटवून घेतले आहे, तुम्ही या,” असे त्यांनी सांगितले. यानंतर किरणचे कुटुंबीय तत्काळ पाटकळला पोहोचले. घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. किरणचा नवरा नागेश सावंत तिच्या वडिलांना भेटला आणि मोठ-मोठ्याने रडू लागला. त्याने सांगितले की, किरणने स्वतःला पेटवून घेतले. घरासमोर कडब्याची गंजी जळाली होती. त्या आगीत एका महिलेचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत होता. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली.

किरण हिच्या वडिलांनी दाखल केलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी तपास सुरू केला. मृतदेहाचे अवशेष फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवले. किरणच्या वडिलांनी सांगितले की, “तो मृतदेह ओळखण्यापलीकडे होता. नागेश सावंत यांनी सांगितले की, माझ्या मुलीला कोणी मारले? याची चौकशी करा,” अशी मागणी त्यांनी केली. पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली.

पोलिसांना तपासादरम्यान किरण ही सातारा जिल्ह्यातील कराड येथे एका व्यक्तीसोबत सापडली आहे. त्यामुळे मंगळवेढ्यात घरासमोर सापडलेल्या महिलेच्या मृतदेहाचे अवशेष सोलापूरच्या फॉरेन्सिक लॅबकडे पाठवले. पोलिसांनी सांगितले की, DNA तपासणी आणि फॉरेन्सिक अहवालानंतरच त्या महिलेची ओळख पटू शकेल. त्यामुळे आता सगळ्यांचे लक्ष त्या अहवालाकडे लागले आहे. या घटनेमुळे परिसरात चर्चांना उधाण आले आहे.

दरम्यान, प्रियकरासोबत पळून जाण्यासाठी विवाहित महिलेने प्रियकराच्या साथीने दुसऱ्या महिलेचा मृतदेह आपल्या घरासमोर आणून जाळला आणि स्वत:च्या हत्येचा बनाव रचला, असे पोलीस सूत्रांकडून सांगितले जात आहे. मात्र तपासाअंती या प्रकरणातील सत्य समोर येणार असून पोलिसांकडून वेगवान तपास सुरू केला आहे.

साखरपुडा पार पडल्यानंतर घरी निघालेल्या युवतीचे रस्त्यातच अपहरण…

मुंबईतील अल्पवयीन विद्यार्थ्यावर लैंगिक अत्याचार प्रकरणी शिक्षिकेचा दावा…

सांगली! प्रेयसीने लव्ह स्टोरीचा केला वाईट पद्धतीने शेवट…

पुणे! प्रेमीयुगुलाची विष प्राशन करून खडकवासला धरणाजवळ आत्महत्या…

सातारा! विवाहितेच्या मृत्यूमागचं गुढ उकललं; प्रेमविवाह अन् पुन्हा प्रेम…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka