Dailyhunt
पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्.

पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्.

पुणे: पिंपरी-चिंचवड शहरातील खराळवाडी येथील एका लॉजमध्ये प्रियकराने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघड झाली आहे. या घटनेमध्ये युवती गंभीर जखमी झाली असून, तिला उपचारांसाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पोलिस पुढील तपास करत ाहेत.

पिंपरी चिंचवड शहरातील खराळवाडी परिसरात असलेल्या राज नावाच्या लॉजमध्ये हा प्रकार घडला आहे. नितेश नरेश मिनेकर असे आत्महत्या केलेल्या प्रियकराचे नाव आहे. हा सर्व प्रकार प्रेम प्रकरणातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज पिंपरी पोलिसांनी वर्तविला आहे.

नितेश मिनेकर हा प्रेयसी सोबत लॉजमध्ये जात असतानाची दृश्ये सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे. लॉजमध्ये गेल्यानंतर काही वेळाने नितेश मिरेकर याने आपल्या प्रेयसीवर धारदार शस्त्राने वार करून तिचा खून करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यानंतर स्वतः गळफास घेत आत्महत्या केली आहे. संबधित घटनेची माहिती मिळताच पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणाचा पुढील तपास पिंपरी पोलिस करत आहेत. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

धक्कादायक! प्रियकराच्या हत्येनंतर प्रेयसीने आरोपीसोबत बसून ओढले सिगारेटचे झुरके…

धक्कादायक! शरीर संबंधानंतर रक्तस्त्राव झाल्याने प्रेयसीचा मृत्यू; अन् प्रियकर…

पुणे हादरलं! प्रेयसीची हत्या करून मृतदेह रिक्षासह आईच्या दारात सोडून प्रियकर फरार…

पोलिसाचे स्वप्न राहिले अधुरे; प्रेयसीला व्हिडिओ कॉल केला अन्…

The post पिंपरी-चिंचवड हादरलं! प्रेयसीला लॉजवर घेऊन गेला अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka