पुणे (संतोष धायबर): पिंपरी-चिंचवडमध्ये परिसरात वास्तव्यास असणाऱ्या युवतीची १३ लाख रुपयांची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक झाली आहे. युवतीने सायबर क्राईम विभागामध्ये तक्रार दाखल केली.
युवतीच्या मोबाईलवर १० सप्टेंबर रोजी एक फोन आला होता. संबंधित व्यक्तीने ड्रग्ज रॅकेटमध्ये तुमचे नाव असल्याचे सांगून धमकी देणे सुरू केले. सुरक्षा विभागातून बोलत असल्याचे सांगून बॅंकेतील रक्कम एका खात्यावर जमा न केल्यास कारागृहात जावे लागेल, अशी धमकी दिली. शिवाय, कुटुंबियांना सुद्धा या प्रकरणात अडकविण्यात येणार असल्याचे सांगून खात्यावरील रक्कम वर्ग करण्यास भाग पाडले. पण, काही वेळातच युवतीला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. युवतीने तत्काळ पोलिस स्टेशन गाठले आणि सायबर क्राईम विभागाकडे तक्रार दाखल केली.
बॅंकेच्या खात्यावरून १३ लाख रुपयांची मोठी रक्कम गेल्यानंतर युवती तणावात आली. पण, दुसरीकडे तत्काळ गुन्हाही दाखल केला असल्यामुळे रक्कम बॅंकेत थांबवली जाऊन परत मिळू शकेल, असेही तज्ज्ञांनी सांगितले. पण, गेल्या २७ दिवसांपासून युवती पोलिस स्टेशनमध्ये विचारणा करण्यासाठी जात आहे. संबंधित अधिकारी आधार देण्याचे काम न करता उलट खरडपट्टी काढत आहेत. रोज रोज येऊ नका सांगत आहेत. यामुळे युवतीला दोन्ही बाजूंनी मनस्तापाला सामोरे जावे लागत आहे.
पिंपरी-चिंचवड पोलिस आयुक्तालयात गेल्यानंतरही समाधानकारक उत्तरे मिळत नाही. उलट तुला कळत नाही का? आम्हाला काय तेवढेच काम आहे का? नको-नको ते ऐकून घ्यावे लागत आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी युवतीने केली आहे.
आयटी युवतीची लाखो रुपयांची ऑनलाइन फसवणूक; पण परत मिळाले पैसे…
युवतीला व्हिडिओ कॉल केला आणि केली लाखो रुपयांची फसवणूक…
सायबर गुन्हेगारांची हिंमत! पुणे पोलिसांचा फोटो वापरून पैसे उकळण्याचा प्रयत्न…
महिलेला फोन आला आणि क्षणात लाखो रुपये गायब; कसे पाहा…
भाजप नेते समरजित घाटगे यांच्या पत्नीला कॉल आला अन् गमावले २० लाख…
The post पिंपरी-चिंचवडमधील युवतीची सायबर गुन्हेगारांकडून फसवणूक अन् पोलिसांकडून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

