Dailyhunt
पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय.

पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय.

मुंबई : महाराष्ट्र पोलिस दलाने मैदानी परिक्षेच्या तारखांच्या होत असलेल्या मागणीची दखल घेतली आहे. पोलिस भरती 2022-23 मध्ये ज्या उमेदवारांनी एकापेक्षा जास्त पदांकरिता अर्ज केले आहेत व त्यांची मैदानी चाचणी एकाच दिवशी आली असेल अश्या उमेदवारांना किमान 4 दिवस अंतराने वेगवेगळ्या तारखा दिल्या जातील, असा निर्णय घेतला आहे, अशी माहिती महाराष्ट्र पोलिसांनी दिली आहे.

राज्यात सुरु असलेल्या पोलिस आणि राज्य राखीव पोलिस दलाच्या भरतीतील मैदानी परिक्षेच्या तारखा या एकाच दिवशी किंवा सलग दिवशी लागून आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थी चिंतेत आहेत, असा प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीचे कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी मांडला होता. सरकारने विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार करता पोलिस भरती व एसआरपीएफभरतीच्या तारखा बदलाव्यात, अशी मागणी त्यांनी केली होती.

महाराष्ट्र राज्य पोलिस दलातील रिक्त पदे भरणे साठी मैदानी चाचणी परीक्षा 19 जून पासून संपूर्ण राज्यभर सुरु होणार आहे. उमेदवारांना विविध पदांकरिता (पोलिस शिपाई, चालक, बँडसमन, सशस्त्र पोलिस शिपाई, तुरुंग विभाग शिपाई) एका घटकात किंवा वेगवेगळ्या घटकांत अर्ज करता येतात. त्यानुसार काही उमेदवारांना एकाच दिवशी अथवा लागोपाठचे दिवशी दोन पदांकरिता मैदानी चाचणी साठी हजर राहणे बाबत ची स्थिती निर्माण होवू शकते व त्यामुळे काही उमेदवरांची गैरसोय होवू शकते. यामुळे सर्व घटक प्रमुखांना व संबंधित विभागास सूचना देण्यात आली आहे की, ज्या उमेदवारास एकच वेळी दोन पदांकरिता मैदानी चाचणीस हजर राहणे साठी सूचना दिली असेल असा उमेदवार पाहिल्या ठिकाणी हजर राहिल्या नंतर त्या उमेदवारांना दुसरी ठिकाणी वेगळी तारीख देण्यात यावी, अशा सूचना केल्याचं महाराष्ट्र पोलिसांच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दुसऱ्या ठिकाणचे घटक प्रमुखांनी अशा उमेदवारांची मैदानी चाचणी घ्यावी. तसेच मैदानी चाचणी ची पहिली तारीख आणि दुसरी तारीख यामध्ये किमान ४ दिवसांचे अंतर असावे. मात्र या करिता उमेदवार पहिल्या मैदानी चाचणीस हजर होता याचे लेखी पुरावे दुसऱ्या मैदानी चाचणी वेळी सादर करावे लागतील, असे पोलिस दलाकडून सांगण्यात आले आहे.


पोलिस कर्मचारी, अधिकाऱ्यांसाठी पोलिसकाकाची विशेष 'सन्मान योजना'

पोलिस भरती आणि SRPF भरतीची मैदानी परीक्षा एकच दिवशी आल्याने राज्यभरातील विद्यार्थांच्या भावना लक्षात घेऊन पोलिस भरती करणाऱ्या युवांना दोन्ही मैदानी परीक्षांना परवानगी देण्याचा निर्णय घेतल्याबद्दल सरकारचे आभार, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे. आता ऐन पावसाळ्यात भरती प्रक्रिया होत असल्याने मैदानी चाचणीस येणाऱ्या युवकांना त्रास होणार नाही यासाठी सरकार निवाऱ्याबाबत आवश्यक ती पावलं उचलेल, ही अपेक्षा असल्याचे रोहित पवार म्हणाले होते.

महाराष्ट्र पोलिस दलात भरती होणाऱ्यांसाठी महत्त्वाची माहिती…

महाराष्ट्र राज्य पोलिस दलात 17471 रिक्त जागांवर भरती; पाहा सविस्तर…

मराठा तरुणांना पोलिस भरतीसाठी मोठा दिलासा! गृहमंत्र्यांची विधानपरिषदेत घोषणा…

महाराष्ट्र पोलिस भरती ऑनलाइन अर्ज 5 मार्चपासून; पाहा सविस्तर माहिती…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पोलिस भरतीच्या मैदानी चाचणीबाबत महाराष्ट्र पोलिस दलाचा मोठा निर्णय… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka