Dailyhunt
रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!

रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!

(संतोष धायबर, santosh.dhaybar@gmail.com) रोहिदास पवार हे गेल्या १४ वर्षांपासून पोलिस दलात कार्यरत आहेत. रात्रंदिवस अभ्यास करून फक्त आणि फक्त अभ्यासाच्या जोरावर बँकेत नोकरी मिळाली.

पुढे स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून डीवायएसपीची परीक्षा पास झाले. बँकेची नोकरी सोडून वयाच्या २५व्या वर्षी ते पोलिस दलात दाखल झाले आहेत. सध्या पुणे शहर पोलिस दलात ते पोलिस उपायुक्त (मुख्यालय) म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याविषयी थोडक्यात…

रोहिदास पवार यांचा खरपुडी (ता. खेड, जि. पुणे) येथील एकत्र शेतकरी कुटुंबातील जन्म. वडिलांचे अवघे पाचवीपर्यंत शिक्षण. पण, आपल्या मुलाने उच्च शिक्षण घेऊन अधिकारी बनावे, अशी आई-वडिलांची इच्छा. कुटुंबामध्ये कोणीही पोलिस अधिकारी अथवा उच्च शिक्षित नसताना रोहिदास पवार यांनीसुद्धा रात्रंदिवस अभ्यास करून आई-वडिलांचे स्वप्न साकार केले आहे. पोलिस दलात दाखल झाल्यानंतर त्यांनी ठिकठिकाणी धडाकेबाज कारवाया केल्या आहेत.

शिक्षण…
रोहिदास पवार यांचे दहावीपर्यंत खरपुडी (ता. खेड) येथे मराठी माध्यमातून शिक्षण झाले. दहावीला २००० मध्ये चांगले गुण प्राप्त केल्यानंतर पुढील शिक्षणासाठी खेड येथील महाविद्यालयात प्रवेश घेतला. ११वी, १२वीचे शिक्षण खेडमध्ये झाल्यानंतर पुढील शिक्षणासाठी विद्येच्या माहेरघरात म्हणजेच पुणे गाठले. बारावीला मिळालेल्या चांगल्या गुणांमुळे बीएस्सी अॅग्रीला प्रवेश घेतला. २००४ मध्ये पदवी प्राप्त केल्यानंतर एमएस्सी अॅग्रीसाठी राहुरी (जि. अहमदनगर) येथे जाऊन पूर्ण केले.

अधिकारी मित्रांकडे पाहून मिळाली प्रेरणा…
रोहिदास पवार हे शेतकरी कुटुंबातून पुढे आले आहेत. कुटुंबाची आर्थिक परिस्थितीही नाजूक. यामुळे शिक्षणाशिवाय पर्याय नव्हता. अभ्यासात हुशार असल्यामुळे आणि शिक्षण घेतले तरच पुढे जाता येईल, हे त्यांनी शाळेत असतानाच ओळखले होते. यामुळे अभ्यास करून अधिकारी होण्याचे त्यांचे स्वप्न होते. बी.एसस्सी. अॅग्री करत असताना अनेक मित्र स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी होत असल्याचे पाहायला मिळाले. यामुळे त्यांनीही स्पर्धा परीक्षा देऊन अधिकारी होण्याचे ठरवले.
ग्रामीण भागातील मुलांना २५-३० वर्षांपूर्वी स्पर्धा परीक्षांबद्दल फारसे माहिती नव्हते किंवा आजच्या सारखे इंटरनेटचे जाळेही पसरलेले नव्हते. शिवाय, ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्यामुळे रोजीरोटीचा प्रश्न असे. यामुळे दहावी किंवा बारावी झाल्यानंतर एकतर डीएड किंवा आयटीआय करून एखाद्या कंपनीमध्ये नोकरी शोधत. पण, रोहिदास पवार यांना बीएस्सी अॅग्रीचे शिक्षण घेत असताना स्पर्धा परीक्षेबाबत समजले आणि त्यांनी अभ्यासाच्या जोरावर यश मिळवले.

जिद्द खेचून यश आणले…
रोहिदास पवार यांनी उच्च शिक्षणसाठी गाव सोडले होते. काही तरी बनून दाखविण्याची जिद्द होती. गावातून बाहेर पडलो तर काही तरी होऊन दाखवायचे, हे त्यांनी मनोमन ठरवले होते. एकतर आर्थिक परिस्थिती नाजूक होतीच आणि काहीतरी बनायचे होते. यामुळे चार-चार महिने ते गावाला जात नसत. गावाला गेले तरी लगेच परत शहराकडे परतायचे. कारण, काहीतरी होऊन दाखवण्याची जिद्द होती. अखेर, त्यांनी अधिकारी होऊन दाखवले आणि ताठ मानेने गावात परतले.

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी ऑनलाइन पुस्तक खरेदी करा…
पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl


पोलिसकाका पुणे शहर- भाग १ या पुस्तकामध्ये पुढील पोलिस अधिकाऱ्यांच्या मुलाखती…
१) रितेश कुमार : शांत आणि संयमी पोलिस अधिकारी!
२) संदीप कर्णिक : पोलिस प्रशासन आणि आरोग्याबाबत शिस्तप्रिय अधिकारी!
३) रामनाथ पोकळे : प्रशासनात धडाकेबाज निर्णय घेणारा अधिकारी!
४) अरविंद चावरिया : वडिलांच्या चॅलेंजमुळेच बनले पोलिस अधिकारी!
५) रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
६) प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
७) अमोल झेंडे : पोलिस दलातील अभ्यासू पोलिस अधिकारी!
८) रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
९) संदीप सिंग गिल : प्राध्यापक ते आयपीएस अधिकारी!
१०) शशिकांत बोराटे : जिद्दीच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी!
११) विक्रांत देशमुख : अभ्यासाच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१२) स्मार्तना पाटील : जिद्दीच्या जोरावर अधिकारी पदाला गवसणी!
१३) विजयकुमार पळसुले : मैत्रीचे नाते जोडणारा पोलिस अधिकारी!
१४) विलास सोंडे : दांडगा जनसंपर्क असलेला पोलिस अधिकारी!
१५) गजानन पवार : शांत, संयमी आणि अनुभवी तपास अधिकारी!
१६) बाळकृष्ण कदम : पोलिस दलातील दीर्घ अनुभव असलेला अधिकारी!
१७) सविता ढमढेरे : वर्दीच्या आकर्षणातून बनल्या पोलिस अधिकारी!
१८) शशिकांत सावंत : प्रशासकीय कामात ठसा उमटवणारा अधिकारी!
१९) बालाजी साळुंखे : धडाकेबाज गुन्हे उघड करणारा पोलिस अधिकारी!
२०) अश्विनी पाटील : जिद्दीच्या जोरावर यश खेचून आणणारी पोलिस अधिकारी!
२१) अभिजीत डेरे : देश सेवेचे व्रत घेतलेल्या कुटुंबातील पोलिस अधिकारी!
२२) प्रियांका निकम : जिद्दीच्या जोरावर गृहिणी ते पोलिस अधिकाऱ्यापर्यंतचा प्रवास!
२३) रेश्मा पाटील : खेळाच्या माध्यमातून बनल्या पोलिस अधिकारी…
२४) प्रशांत शिंदे : पोलिस आणि कुटुंबीयांच्या उन्नतीचा ध्यास घेतलेला सहकारी!
२५) नितीन जगताप : पोलिस खात्याची वर्दी आणि संगीत क्षेत्रातील दर्दी!
२६) आजम शेख : अधिकारी घडवायचेत!
२७) आबिद सय्यद : पोलिस दलासोबत जिव्हाळ्याचे नातं!
२८) पुनीत बालन: लष्करात जाण्याची इच्छा अन् देशसेवेचे व्रत!

पुस्तक Online खरेदी कराः

Loading…

पुस्तकाचे नावः पोलिसकाका (पुणे शहर – भाग १)
गुगल फॉर्म: https://surl.li/siobl
किंमत – 350 रुपये
गुगुल पे – 9881242616
WhatsApp: 92721 94933
अधिक माहितीसाठी संपर्क: संदिप कद्रे- 98508 39153

Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक! पोलिस अधिकारी व्हायचंय?

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post रोहिदास पवार : अभ्यासाच्या जोरावर बनलेला पोलिस अधिकारी! appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka