मुंबई:
लोकसभा निवडणुकीच्या काळात गैरप्रकार टाळण्यासाठी दक्ष असलेल्या निवडणूक भरारी पथकाकडून शनिवारी (ता. २७) रात्री मुंबई उपनगर परिसरात मोठी कारवाई करण्यात आली. भांडूप परिसरात भरारी पथकाकडून नाकेबंदी करुन गाड्यांची तपासणी सुरु असताना सोनापूर सिग्नलवर एका गाडीत मोठ्याप्रमाणावर रोकड आढळून आली.
पोलिस अधिकारी व्हायचंय?; Police, MPSC, UPSC स्पर्धा परिक्षेसाठी उपयुक्त पुस्तक!
मोटारीमध्ये रोख रक्कम असल्याचे समजल्यानंतर ही गाडी तात्काळ भांडूप पोलिस ठाण्यात नेण्यात आली. याठिकाणी गाडीतील पैशांची मोजणी करण्यात आली. ही रक्कम जवळपास साडेतीन कोटींच्या घरात असल्याचे कळाल्यानंतर आयकर विभागाचे कर्मचारी पोलिस ठाण्यात दाखल झाले. आयकर खात्याचे कर्मचाऱ्यांनी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर तपासाला सुरुवात केली आहे.
निवडणूक भरारी पथकाकडून भांडूपच्या सोनापूर सिग्नलजवळ नाकेबंदी करण्यात आली होती. यावेळी एटीएममध्ये पैसे भरण्यासाठी वापरण्यात येणारी एक गाडी पोलिसांनी अडवली. या गाडीची तपासणी केली तेव्हा त्यामध्ये तीन ते साडेतीन कोटी रुपये आढळून आले. व्हॅनमधील सुरक्षा रक्षक आणि कर्मचाऱ्यांकडे अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता त्यांना या रोकड रक्कमेविषयी समाधानकारक स्पष्टीकरण देता आले नाही. त्यामुळे निवडणूक भरारी पथकाने ही व्हॅन भांडूप पोलिसांच्या ताब्यात दिली. ही रोकड रक्कम कुठून आणि कशी आली, याबाबत आयकर विभागाचे अधिकाऱ्यांना पोलिस ठाण्यात बोलवण्यात आले असून आयकर विभागाचे अधिकारी, निवडणूक भरारी पथक अधिकारी आणि पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून…
दुय्यम निबंधकाच्या घरात मिळाले मोठे घबाड…
प्रवीण कुमार पाटील : गोरगरिबांना न्याय मिळवून देणारा अधिकारी!
रंजन कुमार शर्मा : शिकण्याची आवड असलेला आयपीएस अधिकारी!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post पोलिसांना मोटारीचा दरवाजा उघडताच दिसलं मोठं घबाड… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

