Dailyhunt
पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून.

पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून.

पुणे (संदिप कद्रे): पुणे शहरचे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते सिंहगड पोलिस स्टेशन हद्दीतून मिसिंग झालेल्या अल्पवयीन मुलीच्या शोध घेण्यामध्ये केलेल्या महत्वाचे योगदाना बद्दल जाहिर केलेले १ लाख रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे.

सिंहगड रोड, पोलिस स्टेशन, पुणे शहर गुन्हा रजिस्टर क्रमांक २४० / २०२४ भा.दं.वि. कलम ३६३ मधील तक्रारदार यांची अल्पवयीन मुलगी (वय १२) हिस १८/०४/२०२४ रोजी नांदेड सिटी गेटचे बाहेरून सिंहगड रोड पुणे येथील सार्वजनिक रोडवरून कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरून पळवुन नेलेबाबत दिले तक्रारीवरून सिंहगड रोड पोलिस स्टेशन, पुणे येथे गुन्हा नोंद करण्यात आला होता. दाखल गुन्ह्याचा तपास सिंहगड रोड पोलिस स्टेशन कडील पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार करीत असताना मुलीचा शोध घेण्याच्या अनुशंगाने सोशल मिडिया वेगवेगळया व्हॉट्सअप ग्रुप वर मुलीचा फोटो व माहिती प्रसारीत करण्यात आली होती. पोलिसकाकाचे पत्रकार संदिप कद्रे यांनी याबाबत पुढाकार घेतला होता.

सोशल मिडियावर प्रसारित झालेल्या माहितीच्या आधारे शिवाभाऊ पासलकर यांनी त्यांचा मोबाईलवरुन हरवलेल्या मुलीची माहिती त्यांच्या महाराष्ट्र राज्य मिसिंग केस इन्वेस्टीगेशन या व्हॉट्सअप ग्रुपवर प्रसारित केली होती. सदर गुन्ह्याची माहिती पोलिस आयुक्त पुणे शहर अमितेश कुमार यांना मिळाले नंतर दाखल गुन्ह्याचे गांभीर्य ओळखुन सदर मुलीचा शोध घेणेबाबत पुणे शहर पोलिस दलातील सर्व वरिष्ठ पोलिस अधिकारी व इतर पोलिस अधिकारी यांना प्रत्यक्ष फील्ड वर उतरुन अल्पवयीन मुलीचा शोध घेणेबाबत सुचना दिल्या तसेच स्वत – हा सदर मुलीचा बातमीदारामार्फत शोध सुरु केला. त्यानंतर सदर मुलगी ही शरद मंजाभाऊ घोडके यांना केसनंद फाटा, वाघोली येथे सदर मुलगी ही वडापाव खाताना पाहिलेचे माहिती मिळाल्यानंतर स्वतः सदर परिसरात भेट देवुन तेथील आजुबाजुच्या लोकांना व इतर लोकामार्फत सदर मुलीची माहिती देवून मिसिंग मुलीची माहिती देणारे व्यक्तीस १ लाख रुपयाचे बक्षीस जाहिर केले.

मुलीचा शोध सुरु असताना ती केसनंद फाटा या ठिकाणी वडापाव खाल्ल्या नंतर ती नगर पुणे रोडने पुढे पायी गेल्याचे तपासात निष्पन्न झाले व इसम नामे युवराज इरफान वानखेडे यांनी ती रांजणगाव येथील महागणपती मंदिराच्या परिसरात असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यानुसार सदरची मुलगी ही रांजणगाव महागणपती मंदिर येथे मिळुन आली. तिला सुरक्षितरित्या तिच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

सदर मुलीचा शोध घेण्यामध्ये
१) शिवाभाऊ पासलकर, यांनी हरवलेल्या मुलीची माहिती त्यांच्या महाराष्ट्र राज्य मिसिंग केस इन्वेस्टीगेशन या व्हाटस ग्रुप वर प्रसारित करुन सदर मुलगी ही महाराष्ट्र
वडापाव,केसनंद फाटा,वाघोली या ठिकाणी दिसून आल्यानंतर त्यांचे मित्रासह सदर मुलीचा वाघोली परिसरात प्रत्यक्ष शोध घेतला व सदर मुलीचा फोटो प्रसारित केल्यामुळे मुलगी रांजणगाव येथे मिळुन येण्यास मदत झाली.

२) श्री.शरद मंजाबापु घोडके हे १८/०४/२०२४ रोजी एस. टी. बस मधुन पुण्याकडे जात असताना हरवलेली मुलगी हीला महाराष्ट्र वडापाव, केसनंद फाटा, वाघोली येथे प्रत्यक्ष वडापाव खाताना पाहुन त्यांचे मित्र प्रसाद कोळसे (रा.नांदेड सिटी) यांनी ठेवलेल्या व्हाटस अप स्टेटस मधील हरवलेली मुलगी ही तीच असल्याचे खात्री करुन त्यांचे मित्र प्रसाद कोळसे (वय ३५ वर्ष रा. नांदेड सिटी पुणे) यांना कळवली

३) महाराष्ट्र वडापावचे चालक संभाजी अशोक सातव (वय ३२) यांनी सदर हरवलेली मुलगी ही त्यांचेच वडापाव स्टॉलवर वडापाव खालल्या नंतर ती नगर पुणे रस्ता ओलांडुन पुणे – नगर रोडच्या दिशेने पायी गेल्याचे खात्री करुन सांगितले.

४) युवराज इरभान वानखेडे (वय ५५ वर्ष रा. शिक्रापूर) नमुद हरवलेली मुलगी ही रांजणगाव येथील महागणपती मंदिराजवळील पार्किंगच्या ओटयावर पुस्तक वाचत बसल्याचे पाहून सरदर मुलीची माहिती व्हिडिओ कॉल करुन तिचे आईला, पुणे पोलिस व रांजणगाव पोलिसांना दिली.

५) संजय पाटीलबुआ गाडे (रा. रांजणगाव, गणमेन सेक्युरिटी गार्ड) व ओंकार नितीन देव (मुख्य विश्वस्त रांजणगाव गणपती ट्रस्टी) रांजणगाव येथील महागणपती मंदिराजवळील पार्किंगमध्ये मुलगी मिळून आल्यानंतर तिला सुरक्षितपणे आश्रय देऊन तिच्याकडे चौकशी करुन नातेवाईक व पोलिसांना माहिती दिली.

आज (सोमवार) वरील अ.क्र. १ ते ५ यांना पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांचे हस्ते सदर मुलीच्या शोध घेण्यामध्ये केलेल्या महत्वाचे योगदाना बद्दल जाहिर केलेले १ लाख रुपयांचे बक्षीस विभागून देण्यात आले आहे. सदरची कामगिरी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांच्या पुढाकाराने व प्रत्यक्ष सहभागाने पोलिस सह आयुक्त, पुणे शहर, प्रविण पवार, अपर पोलिस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग प्रविणकुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलिस अधिकारी व पोलिस अंमलदार यांनी केलेली आहे.

पोलिसकाका, पुणे पोलिस आयुक्तांची तत्परता! हरवलेली मुलगी सापडली रांजणगावात…

पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी तृतीयपंथींबाबत घेतला मोठा निर्णय…

पुणे शहरातील 85 प्रतिष्ठित व्यक्तींची सुरक्षा काढण्याचे अमितेश कुमार आदेश…

पुणे शहरात वाहन तोडफोड करणाऱ्यांची आता खैर नाही: अमितेश कुमार

पुणे पोलिस आयुक्तांनी गुन्हेगारांना दिली तंबी…

पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…

The post पुणे पोलिस आयुक्तांनी एक लाख रुपयांच्या बक्षिसाची रक्कम दिली विभागून… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka