मुंबई : दादर रेल्वे स्टेशनवर बॅगमध्ये मृतदेह सापडल्या प्रकरणी हत्या झालेल्या मूकबधीर अर्शद अली शेख यांच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. पतीच्या हत्या प्रकरणात हात असल्याच्या आरोपावरून पायधुनी पोलिसांनी अर्शदची पत्नी रुकसाना शेखला अटक केली आहे.
मुंबईत पायधुनी परिसरात आरोपी जय चावडाने अर्शद अलीला दारू पिण्यासाठी बोलावले होते. त्यानंतर मित्र शिवजीत सिंह याच्या मदतीने अर्शदची हत्या करण्यात आली. निर्घृण हत्येनंतर जय चावडा मृतदेह एका बॅगेत भरून तुतारी एक्सप्रेसने जाण्यासाठी दादर स्टेशनवर आला होता. त्यावेळी पोलिसांना संशय आल्याने तो पकडला गेला. दरम्यान, हत्येवेळी बेल्जियमच्या नंबरवरून अज्ञात व्यक्तीने व्हिडीओ कॉल केला होता याची चौकशी केली जात आहे. ती व्यक्ती कोण आणि त्याचे या हत्येशी काय कनेक्शन याचा तपास पोलीस करत आहेत.
मुंबईतील दादर रेल्वे स्टेशनवर पोलिसांची चाणाक्ष नजर गेली एका बॅगवर अन्…अर्शद आणि रुकसाना यांचे एकमेकांवर प्रेम होते. दोघांनी २०१२ मध्ये प्रेमविवाह केला होता. त्यांना दोन मुलेही आहेत. रुकसानासुद्धा मूक आहे. तर अर्शद लहानमोठी कामे करत होता. श्रीमंत असणाऱ्या जय चावडा आणि शिवजीत याच्याशी त्याची मैत्री झाली होती. जय हा अंधेरीत एका लॅबमध्ये अॅनिमेशनचे काम करतो. त्याचे कुटुंबिय कॅनडात राहते. रविवारी अर्शद, जय आणि शिवजीत यांनी एकत्र दारु पार्टी करायचे ठरवले होते. जयने घरी शिवजीतला सोबत घेऊन अर्शदची हत्या केली. रुकसानासोबतच्या संबंधात अडथळा ठरत असल्याने अर्शदच्या हत्येचा कट रचला. जयने शिवजीतवर सर्व ढकलण्याचाही प्रयत्न केला. त्याने जबाबातही खोटी माहिती दिली होती. पोलिस पुढील तपास करत आहेत.
दादर स्टेशनमध्ये बॅगेत सापडलेल्या मृतदेह प्रकरणात मोठं ट्विस्ट; मैत्रिणीसाठी…
यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले…
Video: क्रिकेटपटू विनोद कांबळी याची दुरावस्था; चालताही येईना…
हृदयद्रावक! कुत्रा चिमुकलीच्या अंगावर आदळल्याने मृत्यू तर कुत्रा…
लव्ह जिहाद! पाकिस्तानातून होमगार्ड जवानाला आला फोन अन् म्हणाला…
जवान चंदू चव्हाण करणार सहकुटुंब आत्मदहन!
पोलिसकाकाच्या बातम्यांसाठी Join करा Whatsapp Group…
The post प्रेम, लव्ह मॅरेज अन् प्रेमसंबंध! दादर सूटकेस प्रकरणात पत्नीला अटक… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

