मुंबई : उरणधील यशश्री शिंदे (वय २०) या युवतीच्या हत्येने राज्यात खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणातील दाऊद शेख या मुख्य आरोपीला कर्नाटकमधून बेड्या ठोकल्या आहेत. आरोपी दाऊदकडे यशश्रीचे आक्षेपार्ह फोटो होते.
आरोपीला बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. आरोपीने आपल्या कबुली काय म्हटले पाहा…
यशश्री शिंदे (वय २०, रा. उरण) हिची दाऊद शेखने धारदार शस्त्राने वार करुन हत्या केली. या प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. 30 जुलैला पोलिसांनी आरोपीला कर्नाटकातील गुलबर्ग्यातून अटक केली. पोलिसांनी खाक्या दाखवताच आरोपी दाऊद बोलता झाला. 25 जुलै रोजी दाऊद आणि यशश्रीची भेट झाली. या भेटीत दोघांमध्ये जोरदार खटके उडाले. आपल्यासोबत पळून येण्यासाठी दाऊद यशश्रीला जबरदस्ती करत होता. यशश्री मात्र दाऊदसोबत जाण्यास तयार नव्हती. दाऊद आपल्या भूमिकेवर ठाम होता. दोघांमध्ये कडाक्याचे भांडण झाले. यशश्री सोबत येत नसल्याने दाऊदला राग अनावर झाला. रागाच्या भरात त्याने यशश्रीवर सपासप वार केले आणि ती रक्तबंबाळ झाली. दाऊदने तिचा चेहरा छिन्नविच्छिन्न केला. यात शेवटी यशश्री मरण पावली.
दाऊद जेलमध्ये गेला. कोविडकाळात तो बेलवर सुटला आणि पुन्हा बंगळुरूला गेला. काही काळाने त्याने पुन्हा यशश्रीला संपर्क केला. दाऊद यशश्रीला भेटण्यासाठी वारंवार आग्रह करत होता. तुझे फोटो व्हायरल करेन अशा धमक्या देत होता. दोघं एकमेकांच्या संपर्कात होते, मात्र यशश्रीचा त्याला भेटण्याला विरोध असायचा. काही वेळा यशश्रीने दाऊदचा नंबर देखील ब्लॉक केला होता. अशावेळी दाऊद आपला मित्र मोहसिनच्या फोनवरुन तिला संपर्क साधायचा.
शेवटच्या भेटीत त्यानं सोबत पळून येण्यासाठी तिच्याकडे तगादा लावला होता. लग्न करुन बंगळुरूला राहू, तिकडे नवीन संसार थाटू असा अग्रह धरला होता. यशश्री मात्र पळून जाण्यास तयार नव्हती. यशश्रीचा नकार दाऊदला पचला नाही अन् रागाच्या भरात त्यानं यशश्री संपवले.
पोलिसकाका Video News: 01 ऑगस्ट रोजीच्या Top 10 बातम्या…
दाऊद शेख आक्षेपार्ह फोटो दाखवून यशश्रीला करायचा ब्लॅकमेल…
यशश्री शिंदे हिच्या शवविच्छेदन अहवालातून महत्त्वाची माहिती समोर…
यशश्री शिंदे हिची अत्यंत क्रूरपणे हत्या; आरोपी कोण पाहा…
प्रेम! हात, पाय, स्तन कापून आणि गुप्तांगावर वार अन् निर्घृण हत्या…
The post यशश्री शिंदे हिच्या हत्येची इनसाईड स्टोरी; आरोपीने सांगितले… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

