Dailyhunt
प्रेमविवाहाचा थरकाप उडवणारा शेवट; गरोदर पत्नीचे केले तुकडे अन्.

प्रेमविवाहाचा थरकाप उडवणारा शेवट; गरोदर पत्नीचे केले तुकडे अन्.

हैदराबाद : प्रेमविवाह केलेल्या युवकाने आपल्या गरोदर असलेल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना मेडिपल्ली येथे उघडकीस आली आहे. प्रेमविवाह केलेल्या तरुणाने अशाप्रकारे आपल्या पत्नीची हत्या केल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

घटनेचा पुढील तपास सुरू आहे.

बी स्वाती (वय २१) असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. समाला महेंद्र रेड्डी असे आरोपी पतीचे नाव आहे. महेंद्र आणि स्वाती यांनी गेल्यावर्षी वर्षी २० जानेवारी २०२४ रोजी कुकटपल्ली येथील आर्य समाजाच्या पद्धतीने प्रेम विवाह केला होता. विवाहानंतर हळूहळू यांच्यात वाद व्हायला सुरुवात झाली. समाला हा आपल्या पत्नीच्या चारित्र्याचा संशयही घेऊ लागला होता. एप्रिल २०२४ मध्ये स्वातीने विकाराबाद पोलिसांकडे पतीविरोधात हुंडा मागितल्याची तक्रारही दाखल केली होती. गावातील पंचायतीमध्ये हे प्रकरण सोडवले गेले असले तरी महेंद्रच्या मनातील संशय मात्र कायम होता. स्वाती पाच महिन्यांची गर्भवती असतानाही त्यांच्यात वाद होत होते.

स्वातीने २२ ऑगस्ट २०२५ रोजी माहेरी जाण्याचा निर्णय घेतला. याला महेंद्रने विरोध केला. पण स्वाती आपल्या माहेरी जाण्यावर ठाम होती. यामुळे संतापलेल्या महेंद्रने दुसऱ्याच दिवशी, २३ ऑगस्ट रोजी पत्नी स्वातीचा गळा दाबून खून केला. या क्रूर हत्येनंतर महेंद्रने पुरावा नष्ट करण्यासाठी अमानुष कृत्य केले. त्याने कुऱ्हाडीने पत्नीच्या मृतदेहाचे तुकडे केले. डोके, हात आणि पाय त्याने मुसी नदीत फेकून दिले, तर मृतदेहाचे धड खोलीतच लपवून ठेवले होते. या घटनेची माहिती मिळताच मेडिपल्ली पोलिसांनी तत्काळ तपासाची चक्रे फिरवली आणि आरोपी पती महेंद्रला अटक केली. पोलिस पुढील तपास करत आहेत.

दोन लग्न झालेल्या महिलेचे माजी सरपंचासोबत जुळले प्रेमसंबंध अन् पुढे…

अनैतिक प्रेमसंबंध! महिलेच्या दिराने घरातील टाईल्स काढली अन्…

प्रेम! पोलिस अधिकारी असलेल्या मैत्रिणीला लष्करातील जवानाने संपवलं अन्…

दीराच्या प्रेमात वेडी झाली अन् नवऱ्याला संपवलं; चॅटींग व्हायरल…

प्रेम प्रकरण! फोन सायलेंट मोडवर अन् प्रेयसीचा झाला मोठा गैरसमज…

The post प्रेमविवाहाचा थरकाप उडवणारा शेवट; गरोदर पत्नीचे केले तुकडे अन्… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka