Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून.

प्रेमविवाहानंतर दाजीने केला एकुलत्या एका मेव्हण्याचा खून.

पुणे : प्रेमविवाह केल्यानंतर पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करून तिला सोडचिठ्ठी देण्यास नकार दिला तसेच मेव्हण्याचा खून केल्याची धक्कादायक घटना खामगाव (ता. दौंड) परिसरात घडली आहे. एकुलता एक मुलाचा खून झाल्याने आईचा आक्रोश हृदय हेलवणारा होता.

दौंड तालुक्यातील खामगाव -गाडमोडी येथे शनिवारी (ता. ३) ही घटना घडली आहे. सुरज राहूल भुजबळ (वय २३) असे खून‌ झालेल्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी अमित जयवंत बहिरट (वय २४ )आणि समिर जयवंत बहिरट (वय २२) या दोघा सख्या भावांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत सुरज याची बहिण संजना हिचा प्रेम विवाह‌ अमित‌ बहिरट याच्याशी दिड वर्षापुर्वी झाला होता. दोघे मुंबई येथे रहात होते. अमित हा दारु व्यसनातुन संजनाचा छळ करत होता. त्याच्या त्रासाला कंटाळून संजना माहेरी आली होती. तरी देखील त्या ठिकाणी येऊन अमित बहिरट हा पत्नी संजना हिचा छळ करत होता. त्यामुळे संजनाच्या फिर्यादीनुसार अमित बहिरट याच्याविरुद्ध यवत पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. यावेळी नातेवाईकांनी घेतलेल्या समझोता बैठकीतच‌ अमितने संजनास सोडचिठ्ठी देण्यासाठी ५ लाख रुपयांची मागणी केली. त्यावेळी अमित याने सोडचिठ्ठी तर देणार नाही, तसेच तुझ्या मुलाचे तुकडे करीन अशी धमकी सुरजच्या आईला दिली होती.

सुरज हा शनिवारी त्यांच्या कापड दुकानात बसला होता. अमित जयवंत बहिरट आणि समीर जयवंत बहिरट या दोघा भावांनी सुरज राहुल भुजबळ याचा खून केला. एकुलता एक मुलाचा खून झाल्याने आईने हंबर्डा फोडला होता. घटनास्थळी उपविभागीय पोलिस अधिकारी अण्णासाहेब घोलप, सहाय्यक पोलीस निरिक्षक प्रविण सांगे यांनी भेट दिली. याप्रकरणी अमित बहिरट व समीर बहिरट या दोघांनाही अटक करण्यात आली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

कोल्हापुरातील जवानाची अखेर मृत्यूशी झुंज संपली; पत्नी, प्रियकरावर गुन्हा दाखल…

पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…

प्रेमसंबंधात अडथळा! पुणे शहरात वेबसिरिज पाहून केला खून अन् मृतदेह…

पिंपरी-चिंचवडमध्ये 'सैराट'ची पुनरावृत्ती; साडूने केला खून…

मेव्हणी आणि दाजीचे प्रेमसंबंध अन् महिन्यातच नवऱ्याचा खून…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka