Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
प्रियकरासोबत दोघांना रंगेहाथ पकडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद.

प्रियकरासोबत दोघांना रंगेहाथ पकडल्याची घटना सीसीटीव्हीत कैद.

भोपाळ (मध्य प्रदेश): ग्वाल्हेरच्या तारागंज पुल भागात राहणाऱ्या युवकाने त्याची पत्नी आणि तिच्या प्रियकराला रंगेहाथ पकडल्यानंतर दोघांनी मिळून त्याला कारने चिरडून ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना झाशी रोड बसस्थानकाजवळ घटना घडली आहे.

पती अनिल पाल यांचा आरोप आहे की, पत्नी आजारपणाच्या बहाण्याने 20 मार्च रोजी घराबाहेर पडली होती. पत्नीवर संशय असल्यामुळे पाठलाग केला. प्रियकर मंगल सिंहसोबत कारमध्ये पाहिले. सिग्नलवर तिला रंगेहाथ पकडण्यासाठी कारजवळ गेला असता, तिच्या प्रियकरच्या कारने जोरदार धडक दिली आणि काही अंतरावर फरफटत नेले. या हल्ल्यात अनिल गंभीर जखमी झाला आहे. संबंधित घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

अनिल पालने पत्नी आणि तिचा प्रियकर मंगल सिंह कुशवाह यांच्याविरोधात झाशी रोड पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. पती अनिल पालने पोलिसांना सीसीटीव्हीही उपलब्ध करून दिला आहे, ज्यामध्ये एक निळ्या रंगाची कार तिला धडकून फरफटत नेताना दिसत आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनरल स्टोअर ऑपरेटर अनिल पाल यांचा आठ वर्षांपूर्वी टेकनपूर येथील एका युवतीसोबत विवाह झाला होता. अनिलने पोलिसांना सांगितले की, पत्नी वारंवार माहेरी जात असे. काही वर्षांनंतर, टेकनपूरच्या मंगल सिंगसोबत तिचे पूर्वीपासून प्रेमसंबंध असल्याचे समोर आले. प्रेमसंबंध थांबवण्यास सांगितले असता पत्नी धमकी देत होती. अनिल पाल याच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत.

सासरा आणि सुनेला रंगेहात पकडले अन् दुसऱ्याच दिवशी नको ते घडलं…

Video: पोलिसाने पकडले पत्नीला युवकासोबत रंगेहाथ अन्…

Video: सरपंचाला मैत्रिणीसोबत रंगेहात पकडलं, बायकोनं धू-धू धुतलं…

मेहुणी आणि दाजीला शेतामध्ये सासूने पकडले रंगेहाथ…

पोलिस अधिकाऱ्याला वहिनीसोबत रोमान्स करताना रंगेहाथ पकडले अन्…

मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडल्यावर गावभर रंगली प्रेमाची चर्चा…

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka