Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार.

पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार.

पुणे: पुणे शहरातील मंगळवार पेठ भागात असलेल्या भीमनगर कमानीजवळ आज (रविवार) पहाटे गोळीबाराची घटना घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी घटनास्थळावरूनच रोहित माने (वय ३२, रा. लोहियानगर) या सराईत गुन्हेगारासह त्याचा साथीदार कासीम अन्सारी यालाही ताब्यात घेतले आहे.

दोघांकडून एक पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.

'पुणे गणपती डायरी २०२५-२६'ची प्रकाशनपूर्व नोंदणी सुरू…

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किरण केदारी, शाम गायकवाड, अश्पाक शेख आणि संतोष कांबळे हे चौघेजण मंगळवार पेठेतील भीमनगर कमानीजवळ पहाटे पाचच्या सुमारास गप्पा मारत उभे होते. त्याचवेळी आरोपी दुचाकीवरून त्या परिसरात ये-जा करत होते. त्यांना हटकल्याचा राग आरोपींना आला. त्यातून त्यांनी या चौघांच्या दिशेने गोळीबार केला. सुदैवाने कोणालाही गोळी लागली नाही. घटनेची माहिती मिळताच फरासखाना पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन दोन्ही आरोपींना अटक केली.

गोळीबाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने कारवाई करत रोहित मानेला जागीच पकडले. तर काही वेळातच त्याचा साथीदार कासीम अन्सारी याच्याही मुसक्या आवळल्या. पोलिसांनी दोघांकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि काही काडतुसे हस्तगत केली आहेत.

रोहित माने हा पोलिसांच्या रेकॉर्डवरील गुन्हेगार असून, त्याच्यावर यापूर्वीही आर्म्स ॲक्ट, खुनाचा प्रयत्न आणि मारहाण यांसारख्या गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. सध्या गुन्हे शाखा आणि फरासखाना पोलिस ठाण्याचे अधिकारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. या घटनेमुळे मंगळवार पेठ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत.

Cyber Crime! पुणे शहरात सायबर फ्रॉडचे मोठे रॅकेट उघडकीस…

Video: पुणे पोलिसांनी गोळीबार करणाऱ्या आरोपींची काढली वरात…

पुणे! वैष्णवीचा मृत्युपूर्वी मैत्रिणीसोबत संवाद; ऑडिओ क्लिप व्हायरल…

पुणे शहरात शिंदे गटाच्या नेत्याच्या कारवर मध्यरात्रीच्या सुमारास गोळीबार…

Video: पुणे शहरात धुमाकूळ घातलेल्या कोयता गँगची पोलिसांनी काढली वरात…

The post पुणे शहरातील मध्यवर्ती भागात पहाटेच्या सुमारास गोळीबार… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka