Dailyhunt Logo
  • Light mode
    Follow system
    Dark mode
    • Play Story
    • App Story
पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या.

पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या.

पुणेः पिंपरी-चिंचवडमध्ये चुलत बहिणी सोबत असलेल्या प्रेम प्रकरणातून चुलत भावाने भावाची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटना प्रकरणी गौतम रामानंद यादव उर्फ राय याला खंडणी विरोधी पथकाने बेड्या ठोकल्या आहेत.

सचिन यादव याची गुरुवारी गौतमने कोयत्याने वार करून हत्या केली होती. यात अल्पवयीन मुलाचा देखील सहभाग आहे. त्याला देखील पोलिसांनी ताब्यात घेतले असून, पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सचिन यादवचे दीड वर्षांपासून सख्ख्या चुलत बहिणी सोबत प्रेम संबंध होते. त्यांचा या प्रेम प्रकरणाला कुटुंबियांचा विरोध होता. प्रेयसी चुलत बहीण ही कुटुंबाला सोडून सचिन राहत असलेल्या दिघीतील रूम पासून काही अंतरावर राहण्यास गेली होती. यावरून देखील त्यांच्या कुटुंबात रोष होता. गुरुवारी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास गौतम हा त्याच्या अल्पवयीन मित्रासह दिघीतील सचिन यादव च्या रूमवर गेला. तिथे त्यांच्यात वाद झाले आणि याच वादातून गौतमने सचिनवर कोयत्याने सपासप वार केले. या घटनेत गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. घटनेनंतर गौतम आणि त्याचा अल्पवयीन मित्र फरार झाला होता. काही तासातच खंडणी विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक देवेंद्र चव्हाण यांच्या पथकाने गौतमला काळा खडक तर अल्पवयीन मुलाला मावळ मधून ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

पुणे जिल्ह्यात पतसंस्थेच्या अध्यक्षा महिलेची चाकूने वार करून हत्या…

पुणे! वडिलांना 'टकल्या' म्हणाला म्हणून दगडाने ठेचून केला खून…

प्रेम प्रकरण! पुणे जिल्ह्यात मैत्रिणीवरून युवकाने मारली दरीत उडी…

पुणे शहरात एकतर्फी प्रेमातून भररस्त्यात युवतीवर कोयत्याने हल्ल्याचा प्रयत्न…

पुणे जिल्ह्यात अनैतिक प्रेमसंबंधास विरोध केल्याने पतीचा खून…

The post पुणे! चुलत बहिणीसोबत सुरू असलेल्या प्रेमप्रकरणातून भावाची हत्या… appeared first on पोलीसकाका | POLICEKAKA.

Dailyhunt
Disclaimer: This content has not been generated, created or edited by Dailyhunt. Publisher: PoliceKaka